Sat. Jun 6th, 2026

इंदापूर तालुक्यातील शेतकरी हत्ती गवतापासून बायो सीएनजी गॅस तयार करणार

Spread the love

इंदापूर तालुक्यातील शेतकरी हत्ती गवतापासून बायो सीएनजी गॅस तयार करणार


मीरा फिल्म लिमिटेड मुंबई व श्री इंद्रेश्वर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर लगत माळवाडी नंबर एक याठिकाणी हात्ती गवतापासून बायो सीएनजी गॅस व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन दिनांक 14 /5/ 2021 शुक्रवार अक्षय तृतीया व रमजान ईद या दिवशी श्री गुरु हरिदास बोराटे महाराज फड प्रमुख श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फड पंढरपूर यांनी केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री महेंद्र दादा रेडके सदस्य पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ हे होते
या कंपनीचे कार्यकारी संचालक श्री निखील ढोकरे यांनी सांगितले कंपनी शेतकर्‍यांना सभासद करणार असून प्रत्येक शेतकऱ्यास सेंद्रिय शेती साठी मदत करणार आहे शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन हत्ती गवत गवत खरेदी करणार असून बायो सीएनजी गॅस सीएनजी गॅस सेंद्रिय खतनिर्मिती करणार आहे प्रत्येक गावांमध्ये एकच ग्रामोद्योग नेमणार आहे त्यासाठी इच्छुकांनी मोबाईल नंबर 94 039 77 394 व 76 20 95 21 60 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे
या कार्यक्रमासाठी श्री विष्णू घोगरे सर बावडा श्री निखील पर्वते सर भांडगाव श्री संभाजी देवकर लोणी देवकर अँड.कुंडलिक मारकड श्री विशाल ढोकरे श्री सचिन चौरे शेळगाव श्री मंगेश नायकवडी पळसदेव श्री विनोद शिंदे श्री विजय कोकरे वडापुरी श्री राम गायकवाड सुरवड श्री रमेश शिंदे विठ्ठल वाडी या कार्यक्रमासाठी सर्व कोवीडचे नियम पाळण्यात आले होते व उपस्थितांचे आभार श्री विष्णू घोगरे सर यांनी मानले

Related Post

error: Content is protected !!