2ऑक्टोबर ते 20ऑक्टोबर 2021दरम्यान “ग्रामसभा”आयोजन!
पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा आदेश
सचिन तरंगे
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सन 2022-2023 चा ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी दिनकव02ऑक्टोबर2021ते 20ऑक्टोबर 2021या कालावधी त प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामसभा आयोजित करण्याचे आदेश पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी 30सप्टेंबर2021रोजी सर्व तालुक्याचे गट विकास अधिकारी व ग्रामपंचायतींना दिले आहेत.
विशेष म्हणजे या आदेशात ग्रामसभेची पंचायत समिती स्तरावरून संपर्क आधिकरी नियुक्त करून प्रत्येक गावचे ग्रामसभेचे वेळापत्रक या कार्यालयास सादर करण्याचे व गावातील ग्रामसभा पूर्वी प्रभाग स्तरीय सभा,(वार्ड सभा),महिला सभा व बाल सभा आयोजित करण्यात याव्यात असे परिपत्रकात नमूद केले आहे.
ग्रामसभेत कोणत्या विषयावर चर्चा व्हावी ,कोणत्या विषयावर ठराव आयोजित करण्यात यावे या बाबत चे सर्व विषय जिल्हा परिषद ने ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नमूद केले आहे त.
ग्रामसभेत एकूण 24 विषय घेण्यात येणार असून पुढील विषय सभेत घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
“सबकी योजना सबका विकास”या जन मोहिमेअंतर्गत सन 2020-2023 अंतर्गत आर्थिक वर्षाचा ‘ आमचा गाव आमचा विकास आराखडा तयार करणे, कोवि ड 19 साठी लसीकरण न झालेल्या ग्रामस्थांची यादी तयार करणे, कोवि ड 19 लसिकरणाबाबत प्रचार व प्रसिध्दी करून 100 टकके लसीकरण करीता नियोजन करणे, कोरोना मुक्त गाव पुरस्कार योजना बाबत चर्चा करणे,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2021-2022 चे पुरवणी आराखड्याला मान्यता देणे बाबत,,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2022-2023 या आर्थिक वर्षाचे समृध्दी बजेट तयार करून बजेट व आराखड्याला ग्रामसभेची मान्यता देणे बाबत,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गाव पातळीवर ग्राम रोजगार सेवक ची नियुक्ती करणे,आमचा गाव आमचा विकास या उपक्रम अंतर्गत सन 2020-2023 चा ग्रामपंचायत विकास आराखडा (GPDP)तयार करणे,गावातील प्लास्टिक कचरा व्यवस्थापन बाबत चर्चा करणे,जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जन सुविधा व नागरी सुविधा क वर्ग तीर्थक्षेत्र ,जिल्हा परिषद उपकर,ग्रामपंचायत निधी,14 वा वित्त आयोग ,15 वा वित्त आयोग ,मनेरगा योजने अंतर्गत आज रोजी 100 दिवस कार्यक्रम अंतर्गत 31डिसेंबर 2021अखेर ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अपूर्ण विकास कामे पूर्ण करण्याबाबत चर्चा करणे,सार्वजनिक प्रयोजन करीता घरकुल साठी गायरण, शासकीय जागा देण्यास मंजुरी बाबत चर्चा करणे,मतदार नोदणी जन जागृती अभियान राबविने बाबत,ग्रामपंचायत स्तरावर या पूर्वी स्थापन झालेल्या जैव विविधता व्यवस्थापन समितीच्या नवीन कार्यकारणी ची निवड करणे,एखाद्या वस्ती चे व रस्त्याचे जाती वाचक नाव बदलावा याचे असल्यास त्या बाबत चर्चा करणे,जिल्हा परिषद च्या अंतर्गत ग्रामस्तरावर सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये मध्ये सुंदर माझे कार्यालय अभियान राबविण्यात चर्चा करणे, अझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ग्राम सभे मध्ये कायदेविषयक जाणीव जागृती करण्यासाठी तज्ञ व्यक्तीचे व्याख्यान आयोजित करणे,आर्थिक साक्षरता अभियान या जिल्हा परिषद पुणे अंतर्गत उपक्रमासाठी गाव पातळीवर प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या प्रशिक्षणार्थींना ची यादी तयार करणे,महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 अंतर्गत कलम 49 अन्वये गठित करावयाच्या समित्यांची पुनर्रचना सदस्य निवड,निर्मिती इ आवश्यकतेनुसार करणे, माझी वसुंधरा अभियान राबविने,व सूक्ष्म आराखडा तयार करणे माझी वसुंधरा योजने अंतर्गत गावा मध्ये फटाके बंदीचा ठराव घेणे,जिल्हा परिषद पुणे नावीन्यपूर्ण योजने अंतर्गत वैयक्तिक मिळकती पती पत्नी च्या संयुक्त नावे करणे ,,जिल्हा परिषद पुणे नावीन्यपूर्ण योजने अंतर्गत वैयक्तिक मिळकती ना युनिक आय डी फिके शान क्रमांक देणे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 अंतर्गत कलम 49 अन्वये गठित करावयाच्या समित्यांची पुनर्रचना करणे,सार्वजनिक प्रयोजन करीता जागा मागणी करणे,श्री छत्रपति शिवाजी महाराज लोकसहभाग वृक्ष लागवड अभियान राबविण्या बाबत चर्चा करणे,
या सर्व विषयांचा ग्रामसभा विषय पत्रिकेत समावेश करून ग्रामसभा घेनेची कार्यवाही करण्याचे आदेश पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.
