Fri. Apr 24th, 2026

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध जाहीर

Spread the love

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागणार की बिनविरोध होणार याची उत्सुकता होती. मंगळवार दि.12 आक्टोबर रोजी अखेर हे चित्र स्पष्ट झाले असून नेहमीप्रमाणे या ही निवडणुकीत कारखाना बिनविरोध करण्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना यश आले आहे.

या निवडणुकीत दाखल असणारे अर्ज माघारी घेण्यासाठी मंगळवार दि.१२ आक्टोबर हा शेवटचा दिवस होता. या दिवशी २१ जागांसाठी २१ अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली असून केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे.

माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कार्यक्षेत्रातील सभासदांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ही निवडणूक बिनविरोध पार पडत असुन पुन्हा एकदा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवक सहकाऱ्यांना सोबत घेऊन कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची वाटचाल सुरू राहणार आहे.

इंदापूर गटातून भरत शहा शांतीलाल शिंदे रवींद्र सरडे

कालठण गटातून हर्षवर्धन पाटील हनुमंत जाधव छगन भोंगळे

भिगवण गटातून पराग जाधव विश्वास देवकाते गायकवाड निवृत्ती भिकू

पळसदेव गटातून भूषण प्रकाश काळे प्रवीण देवकर रतन हरिश्चंद्र देवकर

महिला राखीव शारदा कुबेर पवार कांचन अशोक कदम

अनुसूचित जाती जमाती दुर्गे केशव विनायक इतर मागास प्रवर्ग सतीश उद्धव व्यवहारे

भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग पारेकर हिरा शंकर

“ब” वर्ग प्रतिनिधी वसंत मोहोळकर

Related Post

error: Content is protected !!