Fri. Apr 24th, 2026

शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण सहसंचालकांनी केले विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

Spread the love

शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण सहसंचालकांनी केले विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

पुणे,दि.6: राज्य शासनाच्या निर्देशानुसार तब्बल अठरा महिन्यानंतर शाळेची घंटा वाजली. शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षण आयुक्त कार्यालयाचे सहसंचालक महेश पालकर यांनी पुणे जिल्ह्यातील बंडोजी खंडोजी धायरी माध्यमिक शाळेस भेट देत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी ,शिक्षकांशी संवाद साधला. शाळेने केलेले कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन तसेच नियोजनाबाबत त्यांनी समाधान् व्यक्त केले.

यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुनंदा वाखारे तसेच शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक, शिक्षण विभागाचे अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!