Fri. Apr 24th, 2026

मुराळी”या दिवाळी अंकासाठी जाहिरातदारांना आवाहन!

Spread the love

“मुराळी”या दिवाळी अंकासाठी जाहिरातदारांना आवाहन!

प्रसिद्ध लेखक राजन गवस यांची निर्मिती

सचिन तरंगे(शिव कल्याण न्यूज नेटवर्क)

महाराष्ट्र राज्यात अत्यंत प्रसिद्ध व वाचनीय असलेला ” मुराळी”अंक दरवर्षी प्रमाणे येणाऱ्या दिवाळीत प्रसिद्ध होत असल्याचे मुराळी अंकाच्या प्रमुख प्रसिद्ध लेखक राजन गवस यांनी आवाहन केले आहे.
गेली 13 वर्ष हा मुराळी दिवाळी अंक प्रसिद्ध केला जातो,सामाजिक विषय घेऊन हा अंक दरवर्षी प्रसिद्ध केला जातो.या अंकास महाराष्ट्रातून चा चांगला प्रतिसाद लाभला आहे.
मुराळी अंकाचे अर्थ कारण फक्त वर्गणीदार यांच्यावर चालत असल्याने जाहिरातदारांना आवाहन केले आहे.
मुराळी मासिक खेड्यातील स्त्रियांचे प्रश्न मांडणारे व्यासपीठ आहे, राजकारण,समाजकारण व संस्कृती बाबत,सजग भान निर्माण व्हावे,स्त्रियांच्या लेखनाला हककाचे व्यासपीठ मिळावे म्हणून मुराळी काम करीत आहे.
मुराळी अंकाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आपल्याकडील संस्थेची,उत्पादनाची,व इतर प्रकारची जाहिरात देऊन सहकार्य करण्याचे आवाहन डॉ राजन गवस यांनी केले आहे.

चौकट

जाहिरातींचा मजकूर व जाहिरातीचा चेक संपादक,मासिक मुराळी,मु पो गारगोटी जि कोल्हापूर या नावे पत्त्यावर पाठवावेत.

जाहिरातीचे दर मलपृष्ठ रक्कम रुपये 15000,अर्धे पान रक्कम रुपये 3000,पूर्ण रंगीत पान रक्कम रुपये 10000,पूर्ण पान ब्लॅक अँड व्हाईट रक्कम रुपये 6000,तर पाव पान रक्कम परत 2000अशी राहील,या करीता चेक अथवा रोख रक्कम बँक ऑफ बडोदा, मुरळी ट्रस्ट, खाते क्रमांक 38120100000285,IFSC code BARBOGARGOTया खात्यावर भरून तसे या कार्यालयास कळविण्याचे आवाहन केले आहे.

Related Post

error: Content is protected !!