Sun. Apr 19th, 2026

मग्रोरोहयो ग्राम साधन व्यक्ती पदावर राहुल बोबडे व पांडुरंग मोहिते यांची नियुक्ती!

Spread the love

मग्रोरोहयो ग्राम साधन व्यक्ती पदावर राहुल बोबडे व पांडुरंग मोहिते यांची नियुक्ती!

सचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)

महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअतर्गत सामाजिक अकेक्षण प्रक्रिये करीता रेडा(तालुका इंदापूर)गावच्या “ग्राम साधन व्यक्ती”पदावर राहुल बोबडे व पांडुरंग मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या पदावर नियुक्ती केल्याची इंदापूर तालुक्यातील गाव निहाय व पद निहाय यादी इंदापूरचे तहसीलदार ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,यांच्या स्वक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.
इंदापूर तालुक्यातील 66 गावात ग्राम साधन व्यक्ती पदावर नियुक्ती करण्यात आल्या असल्याचे इंदापूर चे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी जावक क्र मग्रारोहोयो/कावी/173/2021 च्या दिनांक 11.09.2021 च्या पत्रा नुसार कळविले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअतर्गत इंदापूर तालुक्यातील 90 ग्रामपंचायतीचे सामाजिक अकेक्षण संधर्भिय प्रक्रिया कार्यक्रम आदेशनव्ये दिनांक 6सप्टेंबर 2021 ते 11 आक्टोबर 2021या कालावधी घेण्यात येणार असल्याचे या पत्रात नमूद केले आहे.तसेच या निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना या बाबत चे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे महारष्ट्र राज्य सामाजिक अकेक्षन व पारदर्शकता सोसायटी मुबई यांनी आदेशांकित केले आहे.

Related Post

error: Content is protected !!