Sat. Apr 18th, 2026

हिवाळी पर्यटनासाठी पर्यटन महामंडळाकडून विविध सवलती

Spread the love

हिवाळी पर्यटनासाठी पर्यटन महामंडळाकडून विविध सवलती

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

पुणे : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने राज्य शासनाने बहुतांश निर्बंध शिथिल केले आहेत.
त्यामुळे आगामी हिवाळी पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या
(महाराष्ट्र पर्यटन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एम.टी.डी.सी.)
पुणे विभागाने पर्यटकांसाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत.
दरम्यान, निर्बंध शिथिल केले असले,
तरी अद्याप पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास बंदी आहे. त्यामुळे केवळ निसर्गाच्या सान्निध्यात निवास करण्यासाठी महामंडळाची सर्व निवासस्थाने खुली आहेत.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे टाळेबंदी, विविध निर्बंधांमुळे त्रस्त झालेल्या पर्यटकांना मनमोकळे पर्यटन करण्याला मर्यादा आहेत.
मात्र, घरी बसून कंटाळलेल्या पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात निवास करण्यास परवानगी आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळाने विविध सवलती जाहीर केल्या आहेत.
महामंडळाची पुणे विभागातील सर्व निवासस्थाने सुरू असून  www.mtdc.co  या संकेतस्थळावर ऑनलाइन आरक्षण सुरू करण्यात आले आहे.
याबाबत बोलताना महामंडळाच्या पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे म्हणाले,
‘कोरोना’ नियंत्रणात राहिल्यास ऑक्टोबरपासून पर्यटनाचा हंगाम जोरदार सुरू होणार आहे.
दरवर्षी गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या सुट्यांसाठी नोकरदार वर्ग आणि पर्यटन व्यावसायिक पर्यटनाचे नियोजन करतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देताना निवासस्थानांची संपूर्ण स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
निवासस्थानी येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून गरज भासल्यास पर्यटकांच्या मागणीनुसार पर्यटक निवासात औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Related Post

error: Content is protected !!