Sat. Apr 18th, 2026

महिला पोलिसांना ८ तास ड्युटी; ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांची माहिती

Spread the love

महिला पोलिसांना ८ तास ड्युटी;
ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांची माहिती

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

पोलीस विभागात अनेकवेळा महिला कर्मचाऱ्याकडून ८ तासाची ड्युटी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती.
या मागणीचा विचार करत पोलीस महासंचालक यांच्या सूचनेनुसार पुणे ग्रामीण मधील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना ८ तासाच्या ड्युटीची अंमलबजावणी केली जाणार आहे.
अशी माहिती पुणे ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली.
यावेळी अभिनव देशमुख म्हणाले की,
महिला कर्मचारी यांना कुटुंबाची जबाबदारी सांभाळून ड्युटीवर यावे लागते.
आतापर्यंत १२ तासाची ड्युटी होती.
त्यामुळे महिलांसाठी ८ तासाची ड्युटी केली जावी,
अशी मागणी सतत होत होती.
अखेर याबाबत पोलीस महासंचालक यांच्या सूचनेनुसार पोलीस वेल्फेअरचा भाग म्हणून प्रायोगिक तत्त्वावर ८ तासाच्या ड्युटीची अंमलबजावणी होणार आहे.
यामुळे ३३० महिला कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की,
येणार्‍या काळात या निर्णयाचा आढावा घेऊन,
आणखी कोणत्या विभागाला सामावून घेता येईल का?
याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
तसेच महिला कर्मचार्‍यांच्या ८ तासाच्या ड्युटीच्या निर्णयामुळे कामावर निश्चितच चांगला परिणाम होईल,
असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Post

error: Content is protected !!