Fri. Apr 17th, 2026

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

Spread the love

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

पुण्यातील पोलिस विभागातील मोटर परिवहन विभागात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. राजेश दगडू महाजन
(वय ५०, रा. हरपळे वस्ती, हडपसर)
असे आत्महत्या केलेल्या सहाय्यक उपनिरीक्षकाचे नाव आहे.
हडपसर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार,
राजेश महाजन हे पुणे शहर पोलीस दलातील मोटर परिवहन विभागात कार्यरत होते.
पोलीस विभागात रूजू होण्यापूर्वी महाजन हे लष्करात होते.
त्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ते पोलीस दलामध्ये रूजू झाले होते.
राजेश महाजन यांनी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
राजेश यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली सुसाईड नोट सापडली असून त्या आधारे तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Post

error: Content is protected !!