पंढरपूर चा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिव्हारी….पालकमंत्र्यांचे नियोजन फसल
संपादकीय :-
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस चा उमेदवार निवडून आणण्याची जवाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत , सोलापूर चे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर देण्यात आली,या बैठकीस जलसंदामंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार,सुप्रिया सुळे ,उपस्थित होते.
वास्तविक पाहता इंदापूर तालुका सांभाळता सांभाळता त्यांना नाकी नऊ येते,अशा नेत्याकडे पंढरपूर मंगळवेढा या दोन तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निवडून आणण्याची जवाबदारी देऊन राष्ट्रवादीने खूपच चुकीचा निर्णय घेतला,आणि इथेच पराभवाची सुरुवात झाली,
माजी आमदार भारत भालके यांनी गेली दहा वर्षे अत्यंत चांगल्या प्रकारे मतदार संघ बांधला होता,त्यांची पुण्याई इतकी होती की त्यांच्या मागे त्यांच्या नावाचा वापर करून कोणताही,व कोणत्याही जातीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिलेला उमेदवार निवडून आला असता असा नियोजित मतदार संघ भालके नानांनी तयार केला होता,
पण इथे भारत भालके च्या मृत्यु नंतर त्याचे सुपुत्र भगीरथ भालके यांना भावनिक आधार व आवाहन नंतर ही अपमानास्पद पराभव स्वीकारावा लागला ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी साठी दुर्दैवी घटना आहे,तर पालकमत्र्यांना “धीरे का झटका जोरसे लगा है.”!
दिवंगत माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर भारत भालके यांच्या पत्नी ला उमेदवारी देण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती,परंतु सोलापूर चे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना मतदार संघातील माहिती व जनसंपर्क साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक असलेल्या ची यादी मागविण्यात आली,खासदार शरद पवार यांचा कै भारत भालके यांच्या पत्नीला तर उपुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आग्रह भालके यांच्या पत्नी ऐवजी त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्याचा आग्रह होता.मतदार संघातील वस्तुनिषठपणे माहिती घेऊन या दोघांपैकी कोणास उमेदवारी दिल्याचा फायदा होईल,असे मतदार संघातील मोर्चे बांधणी करून अहवाल पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरण्यात आला,नेमकी हीच बाब खासदार शरद पवार व बारामती लोकसभा मतदार संघाचे खासदार सुप्रिया सुळे यांना खटकली,आणि इथेच सर्व राजकीय मैदानात काम करणारे काळजीत पडले आणि उमेदवाराची राजकीय वाटचाल पराभवाच्या दिशेने सुरू झाली.
सोलापूर चे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची जवाबदारी देताना त्यांनी मत्रालयात मोजक्या व महत्वाच्या बैठकीस उपस्थित रहावे,परंतु इतर संपूर्ण वेळ भगीरथ भालके यांना निवडून आणण्यासाठी व प्रचार यंत्रणा सक्षमपणे राबविण्यासाठी देण्यात यावा असा आदेश पक्षाच्या कोअर कमिटी च्या बैठकीत देण्यात आला,
पक्षाने फारच मोठी जबाबदारी दिली आहे,ती पार पाडून पंढरपूर मंगळवेढा ची
“दिग्वविजयमोहीम”पार पाडण्यासाठी पालकमंत्र्यांचा ताफा सुसाट वेगाने पळत पंढरी च्या नगरीत पोहचला.पक्षाचे कारयकर्ते व पदाधिकारी यांच्या मेरेथोन बैठकाचा धडका देत प्रचार सुरू केला.त्यांनी पाहिली बैठक धनगर समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची घेतली,
भरणे हे पवारांनी ठरविलेले धनगर समाजाचे नेते आहेत,याची परिपूर्ण खात्री या मतदार संघातील असणाऱ्या धनगर समाजातील पदाधिकारी व युवक यांना आहेच.या बैठकीत भरणे यांनी समाजाच्या समस्या, अडीअडचणी या पेक्षा पवार परिवाराचे गुणगान करण्यावर च गाजविली,या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी समाज व समाजातील पदाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राजकीय लाभापासून कसे वंचित ठेवले आहे,याचा पाढाच वाचला,या राजकीय पाड्याचा गुणाकार कसा करायचा हा गंभीर प्रश्न पालकमंत्री भरणे यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण करून गेला,या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अनेक धनगर समाजातील लोकांना राजकीय लाभापासून वंचित ठेवले होते,त्या मुद्यावर भरणे त्यांना आश्वासित करू शकले नाहीत,ही बाब भगीरथ भालके यांना निवडून आणू शकली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पालकमत्र्यांन प्रचारात उतरून धनगर समाजातील मताची वोट बँक ताब्यात घेत आहे,याची जाणीव होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी “धनगर समाजातील आक्रमक व युवकाचे तारणहार”गोपीचंद पडळकर यांना प्रचारात उतरविले,गोपीचंद पडळकर हे या मतदार संघातील व धनगर समाजातील तरुण युवकांचे “आयडॉल”आहेत,याचा फायदा भारतीय जनता पक्षाने घेतला,
भाजपच्या गोपीचंद पडळकर यांच्या राजकीय फलंदाजी समोर भरणे च्या गोलंदाजीचा टिकाव लागला नाही, पडळकर यांच्या राजकीय भाषणा पुढे भरणे आक्रमक पणे समाजाला आपलेसे करू शकले नाहीत,इथेच पालकमंत्र्यांची राजकीय प्रचाराची विकेट निघाली.
भगीरथ भालके यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अजित पवार,जयंत पाटील, रोहित पवार,सुनील शेळके,संजय शिंदे,अमोल मितकरी,सुप्रिया सुळे या सारख्या मराठा समाजातील मंत्री व आमदारांना प्रचारात उतरविले.
हे सर्व जण या मतदार संघात येऊन धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर व धनगर समाजाचे आराध्य दैवत “बिरोबा”यांना प्रचाराचा,निवडणुकीचा मुद्दा सोडून बदनाम करत होते,यातील किती आमदारांना बिरोबा देवस्थान व धनगर समाजातील चालीरीती परंपरा माहित आहेत,त्यांनी आमच्या समाजातील नेत्याला व
बिरोबाला बदनाम करण्याचे जाहीर व्यासपीठ तयार केल्याचे शल्य या समाजातील युवकांच्या त तयार झाल्याने व त्या पुढे भरणे यांचा टिकाव न लागल्याने मतदार भाजपकडे वळला
भगीरथ भालके व समाधान अवताडे असा सामना बरोबरीत सुटणार नाही असा अंदाज राजकीय जाणकारांना होता, हातातला मतदार संघ मराठा समाजातील आमदारांनी
वायफळ भाषणे करून घालविला.अजित पवार यांची भाषा मतदारांना रुचली नाही,जयंत पाटील यांची टप्प्यात आला की कार्यक्रम करायची भाषा ,रुपाली चाकनाकरची भाषा ,सुनील शेळके व रोहित पवार यांची धनगर समाजाचे इतर पक्षांतील नेत्याबद्दल असणारी व विष पसरविण्याचे भाषा मतदारांना आवडली नाही,आम्ही सांगेल तसेच वागले पाहिजे ही घमड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त दिसत होती,
भारतीय जनता पक्षाने अजित पवारांचा भरणे व
शिंदे यांचे घोडे पुढे दामटून मतदार संघ ताब्यात घेण्याचा मनसुबा रोखण्यासाठी इंदापूरचे हर्षवर्धन पाटील व अकलूज चे रणितसिंह विजयसिंह मोहिते पाटील यांना प्रचारात उतरून
रंगत आणली ,आणि इथेच भरणे व संजय शिंदे यांची राजकीय दमछाक झाली,
हर्षर्धन पाटील व मोहिते पाटील यांनी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील सर्व गावे पिंजून काढत भाजपचे समाधान आवतडे यांचा विजयाचा महामेरू पुढे नेला,पाटलांच्या आक्रमक व अभ्यासू भाषणा पुढे भरणेचा टिकाव लागला नाही,
फडणवीस व पडळकर हे एका विशिष्ट समाजाचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रचारासाठी आयात केलेल्या मराठा समाजातील आमदारांनी त्यांना टार्गेट केले,हीच गोष्ट पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील त्या समाजातील मतदारांना खटकली.
नीरा देवधरचे पंढरपूर च्य वाट्याचे पाणी पवारांची लेक सुप्रिया सुळे यांना कायमस्वरूपी बारामती लोकसभा मतदार संघात निवडून येण्यासाठी वळविले,त्या वेळे ला सोलापूर चे पालकमंत्री व राज्य मंत्रिमंडळातील सदस्य असणारे भरणे गप्प बसले होते,याचा जाब प्रचाराला गेल्यावर भरणे यांना मतदार संघातील मतदारांनी विचारला परंतु पवारांच्या भीती पोटी भरणे या मतदारांना
अशवाशित करू शकले नाहीत,याचा फटका बसला,
त्यामुळे एकंदरीत इंदापूरचे नेतृत्व पालकमंत्र्यांच्या रूपाने निष्क्रिय ठरले,ही गंभीर बाब असून ती राष्ट्रवादी स भविष्यात घातक ठरणार आहे,”मी राज्यमंत्री,मी पालकमंत्री”हा हेकेखोर पणा भरणेना अडचणीचा ठरणार असल्याचे ह्या निवडणुकीतील पराभवानंतर स्पष्ट झाले आहे
समाधान आवताडे यांना प्रचारात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले,चंद्रकांत पाटील,प्रशांत परिचारक, लक्ष्मण राव ढोबळे, बाळा भेगडे,खा रणजीतसिंह निंबाळकर,सुभाष देशमख ,सदाभाऊ खोत,यांनी खूपच मोठे योगदान दिले.
