बांधकाम शाखा अभियंता ‘किशोर साळुंखे यांच्या विरोधात पुण्यात उपोषण !!
सचिन तरंगे
( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क )
इंदापुर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागातील शाखा अभियंता किशोर साळुंखे यांनी केलेल्या काटी वडापुरी व वकिलवस्ती ते निरा भीमा साखर कारखाना सह तालुक्यातील केलेल्या कामांची चौकशीसाठी जाहीर उपोषण करण्याचे मौजे रेडा गावचे सामाजिक कार्यकर्ते राहुल बोबडे व पांडुरंग मोहिते यांनी केले आहे.
सदरचे उपोषण हे पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता कार्यालय यांच्या समोर गुरुवार दिनांक 26 ऑगस्ट 2021रोजी होणार असल्याचे त्यांनी जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
इंदापूर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखाधीकारी किशोर साळुंखे हे सोलापूर जिल्ह्यातून इंदापूर येथील उपविभागात हजर होतास त्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंजूर केलेल्या करोडो रुपये किमतीच्या या रस्त्याच्या कामात ठेकेदाराशी आर्थिक हितसंबंध तयार करून जवळपास काही कामे पार्टनरशिप मध्ये करून कामातील अंदाजपत्रकाच्या नमूद केलेल्या वस्तूंचा व घटकांचा कमी वापर करून कोट्यावधी रुपयाची लूट केली आहे याबाबत इंदापूर येथील उपअभियंता धनंजय वैद्य यांना वारंवार तोंडी व लेखी स्वरूपात तक्रारी केल्या परंतु त्यांच्याकडून तक्रारदारांना न्याय मिळत नसल्याने आज गुरुवार दिनांक 26 ऑगस्ट 2021 रोजी आपल्या कार्यालयासमोर उपोषण करून शाखाधिकारी किशोर साळुंके सह उपअभियंता धनंजय वैद्य यांचा जाहीर निषेध करत आहे तरी मांन्य मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांना विनंती करतो की आपण आपल्या स्तराहून खातेनिहाय अथवा विशेष पथकाद्वारे शाखाधीकारी किशोर साळुंखे यांनी केलेल्या कामाची चौकशी करून त्यांनी बनवलेल्या एम बी रेकॉर्डची फेर तपासणी करून त्यांनी शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी त्यांच्यावर 420 चा फौजदारी गुन्हा दाखल करून आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागातून आर्थिक गुन्हेही दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी हे आमचे उपोषण पुण्यात करणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
