Wed. Apr 29th, 2026

धर्मादाय उपायुक्तपदी राहूल मामू यांनी स्वीकारला पदभार

Spread the love

धर्मादाय उपायुक्तपदी राहूल मामू यांनी स्वीकारला पदभार

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

पुणे विभागाचे धर्मादाय उपायुक्तपदी राहूल मामू यांची नियुक्ती झाली आहे. पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे त्यांचा स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपाध्यक्ष ॲड. मोहन फडणीस यांनी प्रास्ताविक केले. येथील वकील कक्षात श्रुतीसागर आश्रम फुलगाव येथील पीठाधीश प.पु. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त धर्मादाय उपायुक्त राहूल मामू यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मामू यांनी धर्मादाय आस्थापने मधील त्यांचे पूर्वाअनुभव व विश्वस्त कायद्याविषयी संकल्पना याविषयी मनोगत व्यक्त केले. पुण्यात येण्यापूर्वी मुंबई येथे सहाय्यक आयुक्त व अमरावती येथे उपायुक्त म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला आहे.
सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्वामीजींनी प्रगत तंत्रज्ञान व अध्यात्मातील संकल्पनांची सांगड घालून मानवी जीवन सुखकर होण्यास प्रयत्न करायला हवेत व तसे उपक्रम फुलगाव येथील आश्रमात यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अमरदीप तिडके, राहूल चव्हाण व राणी मुक्कावार उपस्थित होते. खजिनदार ॲड. रजनी उकरंडे यांनी सूत्रसंचलन केले तर सचिव ॲड. सुनिल मोरे यांनी आभारप्रदर्शन केले.

Related Post

error: Content is protected !!