Wed. Apr 29th, 2026

लाच घेतल्याप्रकरणी स्थायी समिती अध्यक्षांसह पाच आरोपींना पोलीस कोठडी

Spread the love

लाच घेतल्याप्रकरणी स्थायी समिती अध्यक्षांसह पाच आरोपींना पोलीस कोठडी

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षासह पाच जणांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली होती. त्या प्रकरणी आज मे.पुणे न्यायालयात स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, ज्ञानेश्वर पिंगळे (मुख्य लिपिक),
विजय चावरिया (लिपिक),
राजेंद्र शिंदे (संगणक चालक),
अरविंद काळे (शिपाई) हजर करण्यात आले.
त्यावेळी मे.न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर शनिवारीपर्यंत आरोपींना पोलिस कोठडी सुनावली.
यावेळी नितीन लांडगे यांचे बंधू आमदार महेश लांडगे हे देखील मे.न्यायालयाच्या आवारात उपस्थित होते.
सुनावणीनंतर महेश लांडगे यांच्याशी प्रसार माध्यमांनी त्यांची भूमिका जाणून घेतली.
“हे राजकीय षडयंत्र आहे.
याच्यामध्ये नितीन लांडगे आणि त्यांच्या परिवाराचा मागचा इतिहास पाहिला तर या कुटुंबानं समाजकारण केलेलं आहे.
फार मोठा आदर्श या परिवाराचा या शहरामध्ये आहे.
ज्या परिवाराची इतकी संपत्ती आहे.
ते असं करणार नाही.
ज्यांनी कुणी केलं आहे,
त्यांनी हे प्लानिंग करून केलं आहे.
बदनाम करण्यासाठी केलेलं आहे.
यात कोणताही पुरावा नाही.
मे.न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे.”,
असं आमदार महेश लांडगे यांनी सांगितलं.

Related Post

error: Content is protected !!