हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचे उदघाटन व कोव्हिड योध्यांचा सन्मान
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
मौजे निमगाव केतकी येथे अष्टविनायक ग्रुप,भारतीय जनता पक्ष व जाधव परिवारातर्फे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित माजी आमदार ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश (आण्णा) टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली कोविड योध्दा सन्मान व विविध विकास कामांचे उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी अकलूजचे प्रसिद्ध डॉ.इनामदार यांच्या बरोबर तालुक्यातील आरोग्य अधिकारी , नर्स , आशा सेविका, अंगणवाडी सेविका, रूग्णवाहीका चालक यांचा सत्कार करण्यात आला.
कोरोनाच्या लाटेत कोवीड सेंटरला अन्नदान करणारेंचा देखील विशेष सत्कार करण्यात आला , यामध्ये कोवीड सेंटरला पुर्णवेळ सकस आहार म्हणून अंडी,केळी पुरवल्या बद्दल भारतीय जनता पक्ष भ.वी.आ पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे यांचा व अन्नदानाच्या योगदानाबद्दल देशपांडे व्हेज हाॅटेलचे मालक गानबोटे,देशपांडे यांचा कोविडयोध्दा म्हणून सत्कार ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा माजी आमदार योगेश आण्णा टिळेकर व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.त्या प्रसंगी उपस्थित इंदापूर तालुका पदाधिकारी व निमगाव केतकी ग्रामस्थ उपस्थित होते.
