Wed. Apr 29th, 2026

नवीन वाहन क्रमांक मालिका सुरु आकर्षक क्रमांकासाठी 18 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज करावा – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती

Spread the love

नवीन वाहन क्रमांक मालिका सुरु
आकर्षक क्रमांकासाठी 18 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज करावा – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

बारामती दि. 13:- बारामती येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात रोजी खासगी वाहनासाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. ही मालिका दुचाकी वाहनासाठी सुरु करण्यात येत असून चारचाकी वाहनांनादेखील आकर्षक क्रमांक घेता येईल. मालिकेतील नोंदणी क्रमांक प्रथम प्राधान्याने विहित शुल्क भरुन चारचाकी वाहनांना देणेत येईल व त्यानंतर दुचाकी वाहनांना देणेत येईल. मालिकेतील वाहन क्रमांकासाठी ज्या चारचाकी व दुचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क (चारचाकींसाठी विहित शुल्काच्या तिप्पट) भरुन हवे असतील त्यांनी बुधवार दिनांक 18 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11.00 ते सायं. 05.00 या वेळेत अर्ज व शुल्क रक्कमेच्या डी.डी. सह जमा करावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती यांनी केले आहे.
अर्ज नमूना व आवश्यक क्रमांकासाठी भरावे लागणारे शुल्काची माहिती कार्यालयीन वेळेत 13 ऑगस्ट 2021 रोजी उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्जासोबत केंद्रिय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 5 अ मध्ये विहित केलेल्या पत्याच्या पुराव्याची साक्षाकित प्रत सादर करणे आवश्यक असेल (उदा. लाईट बील, टेलीफोन बील इ.) तसेच अर्जदाराची ओळख पटवण्यासाठी अर्जासोबत अर्जदाराने फोटो ओळखपत्राची (उदा. आधार कार्ड/निवडणूक आयोगाचे ओळखपत्र/पासपोर्ट/पॅन कार्ड इ.) साक्षांकित प्रत सादर करावी लागेल.
एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी 20 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12.00 पर्यंत कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल व त्या नंबरचे पाकीट लिलाव पध्दतीने वाटप केले जाईल.
या यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जास्त रक्कमेचा डी.डी. जमा करावयाचा असेल त्यांनी 23 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 03:00 वाजेपर्यत सीलबंद लखोटयात लिलावासाठी पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी विनिर्दिष्ट केलेल्या फी च्या डी.डी. व्यतिरिक्त अर्जदाराचे इच्छेप्रमाणे जादा रक्कमेचे डी.डी. एका लखोटयात स्वत: जमा करावा. सदर डी.डी. ․Dy. R.T.O., Baramati․ यांच्या नावे नॅशनलाईज्ड/शेडयुल्ड बँकेचा बारामती येथील असावा. त्यासोबत अर्जदारास पॅनकार्डची साक्षाकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. दिनांक 23 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 04:30 वाजता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत व्यक्तींसमोर (संबंधित अर्जदार) लखोटा उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रक्कमेचा डी.डी. सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल. लिलावाच्यावेळी चारचाकी वाहनांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
एकदा अरक्षित ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. आरक्षित ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही.
आकर्षक/पसंतीच्या क्रमांकासाठीच्या विहित नमून्यातील अर्ज व मुळ आधार कार्ड व पॅन कार्ड सह अर्जदार यांनी कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये आवेदन सादर करावे, असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती यांनी कळविले आहे.

Related Post

error: Content is protected !!