Wed. Apr 29th, 2026

हिंदी महासागराची तापमानवाढ, भारतात उष्णतेच्या लाटा, पूरपरिस्थितीचा जागतिक अहवालात इशारा

Spread the love

हिंदी महासागराची तापमानवाढ,
भारतात उष्णतेच्या लाटा,
पूरपरिस्थितीचा जागतिक अहवालात इशारा

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

नवी दिल्ली : अन्य समुद्रांपेक्षा हिंदी महासागराची जलद गतीने तापमानवाढ होत असून येत्या काही दशकांत भारतात उष्णतेच्या लाटा येतील आणि पूरपरिस्थितीलाही तोंड द्यावे लागेल,
असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या जागतिक अहवालात सोमवारी देण्यात आला.
पृथ्वीचे तापमान वाढत असल्याने कोणकोणते जागतिक दुष्परिणाम संभवतील, याबाबतचा संयुक्त राष्ट्रांच्या ‘इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेन्ज’ (आय.पी.सी.सी.)चा सहावा अहवाल ‘क्लायमेट चेंज २०२१ – दी फिजिकल सायन्स बेसिस’ प्रसिद्ध करण्यात आला.
त्यात भारताबद्दल गंभीर इशारा देण्यात आला आहे.
हिंदूी महासागराच्या तापमानवाढीमुळे समुद्रपातळीत वाढ होऊन किनारपट्टीच्या सखल भागांमध्ये वारंवार तीव्र पूरपरिस्थिती उद्भवेल,
असे या अहवालात म्हटले आहे.
भारतासारख्या देशांमध्ये वायूकणांच्या (एरोसोल) उत्सर्जनामुळे उष्णतेच्या लाटा निर्माण होतात.
त्यामुळे वायूकणांचे उत्सर्जन कमी करणे हवेच्या गुणवत्तेसाठी महत्त्वाचे आहे,
असे फ्रेडीरिक ओट्टो या हवामानशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.
ओट्टो या ‘आय.पी.सी.सी.’चा अहवाल तयार करणाऱ्यांपैकी एक आहेत.
उष्णतेच्या लाटांमध्ये वाढ होण्याबरोबरच, अतिवृष्टी आणि हिमनद्यांचे वितळणे हेही परिणाम भारतासारख्या देशाच्या बाबतीत संभवतात.
समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे उष्णकटिबंधीय चक्रीवादळे ़किनारपट्टय़ांवर पूरपरिस्थिती निर्माण करतील.
सागरी तापमानवाढीचा हा परिणाम थोपवणे अशक्य आहे,
असेही ओट्टो यांनी नमूद केले.

Related Post

error: Content is protected !!