Tue. Apr 28th, 2026

संजय गांधी निराधार योजना अंतर्गत ऑगस्ट महिन्यातील 205 प्रस्तावांना मंजुरी – सागर (बाबा) मिसाळ

Spread the love

संजय गांधी निराधार योजना अंतर्गत ऑगस्ट महिन्यातील 205 प्रस्तावांना मंजुरी – सागर (बाबा) मिसाळ

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

संजय गांधी निराधार योजनेची ऑगस्ट महिन्याची मासिक आढावा बैठक इंदापूर शहरातील प्रशासकीय भवनात पार पडली. समितीचे सचिव तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्या उपस्थितीत आणि तालुकाध्यक्ष सागर मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.06 रोजी या आयोजित केलेल्या मासिक आढावा बैठक आँगस्ट महिन्यात 209 प्रस्ताव दाखल झाले होते,त्यापैकी 205 प्रस्तावांना मंजूरी देण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष सागर मिसाळ यांनी दिली.तालुक्यात ही नुतन समिती गठीत झाल्यापासून आज अखेर पर्यंत २५० ते ३00 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.

यावेळी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,नायब तहसीलदार सौ.पी.बी.वैयकर, समितीचे सदस्य हनुमंत कांबळे,रहिना मुलाणी,लक्ष्मण पराडे,महादेव लोंढे,नितीन शिंदे,दत्तात्रय बाबर,अजय भिसे,प्रमोद भरणे आदी उपस्थित होते.

शुक्रवार दि.06 आँगस्ट रोजी मंजूर करण्यात आलेल्या एकूण प्रस्तावात संजय गांधी विधवा – 48, संजय गांधी अपंग – 23,श्रावणबाळ योजना – 80,इंदिरा गांधी वृद्धापकाळ – 49,इंदिरा गांधी विधवा योजना – 5 या प्रस्तावांचा समावेश आहे.

संजय गांधी निराधार योजना अंतर्गत पुणे जिल्ह्यात सर्वात अधिक प्रस्ताव मंजूर करीत लाभार्थ्यांना इंदापूर तालुक्याने न्याय दिला असल्याचा दावा तालुध्यक्ष सागर मिसाळ यांनी केला आहे. बारामती लोकसभेच्या खासदार मा. सो सुप्रियाताई सुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली व समितीच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने ही आम्ही सर्व मंडळी एकदिलाने तालुक्यातील लाभार्थ्यांना शासनाच्या या विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करीत आहोत. तालुक्यातील पात्र नागरिकांना आपल्या सर्व कागदपत्रांसमवेत या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव दाखल करावेत. कोणास अडचणी असतील तर त्यांनी समितीशी संपर्क साधावा असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

Related Post

error: Content is protected !!