Tue. Apr 28th, 2026

इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आता 12 ऑगस्ट 21 रोजी

Spread the love

इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आता 12 ऑगस्ट 21 रोजी

श्रीकृष्ण सातव,फलटण प्रतिनिधी :

इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आता 12 ऑगस्ट 21 रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एका निवेदनाद्वारे कळविले आहे.
त्यानुसार परीक्षा परिषदे मार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) ही 9 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असल्या बाबत जाहीर करण्यात आले होते. परंतु त्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूर परिस्थिती व बहुतांश ठिकाणी भूस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी बाबत राज्यातील अनेक संघटनांकडून प्राप्त झालेल्या निवेदन यांचा विचार करून सदर परीक्षा 9 ऑगस्ट ऐवजी 12 ऑगस्ट 21 रोजी घेण्यात येणार आहे. असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे उप आयुक्त शैलजा दराडे यांनी कळविले आहे

Related Post

error: Content is protected !!