Thu. Apr 30th, 2026

लस घेतलेली नसतानाही प्रमाणपत्र, पोलिसांकडे तक्रार; तांत्रिक घोळ की गैरप्रकार ?

Spread the love

लस घेतलेली नसतानाही प्रमाणपत्र,
पोलिसांकडे तक्रार;
तांत्रिक घोळ की गैरप्रकार ?

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
लस घेतलेली नसताना कांदिवलीतील खासगी रुग्णालयांमधून लसीकरणाचे प्रमाणपत्र दिले गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
रुग्णालये यासाठी कोविन अ‍ॅपमधील तांत्रिक दोषांकडे बोट दाखवत आहेत.
पोलिसांनी मात्र यासंदर्भात आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत हा प्रकार कोविन अ‍ॅपमधील तांत्रिक घोळामुळे झाला की यामध्ये गैरप्रकार असावा,
या दिशेने तपास सुरू केला आहे.
नीलेश मेस्त्री (वय ३३) यांनी १४ जुलैच्या रात्री कांदिवलीच्या डहाणूकरवाडी येथील चव्हाण रुग्णालयात कोव्हिशिल्ड लशीकरिता कोविन अ‍ॅपवर नोंदणी केली.
त्यांना १५ जुलैची सकाळी १० ते ११ दरम्यानची वेळ मिळाली.
परंतु त्या दिवशी कार्यालयीन कामामुळे त्यांना लस घेता आली नाही.
म्हणून त्यांनी पुन्हा नोंदणीसाठी ‘कोविन’ सुरू केले.
त्यावेळी संबंधित रुग्णालयातून त्यांनी लशीचा पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दिसले.
मेस्त्री यांनी म.न.से.चे चारकोप विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांच्या मदतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीबाबत चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता,
‘आम्ही तक्रार नोंदवून घेतली आहे.
आणखी एका खासगी रुणालयाबाबत अशीच एक तक्रार आली आहे.
कोविनमधील तांत्रिक घोळामुळे हा प्रकार झाला असावा की गैरप्रकार आहे, याबाबत आम्ही तपास करत आहोत,’
असे त्यांनी सांगितले.

Related Post

error: Content is protected !!