अकरावीच्या प्रवेशाची CET ऑगस्ट मध्ये होणार
शालेय शिक्षण विभागाची माहिती
सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्यूज )
कोरोनामुळे दहावी ची परीक्षा राज्य शासनाकडून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल 16 जुलैला जाहीर केला.
त्यानुसार राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेत दहावीच्या निकालाबाबत सर्व माहिती देण्यात आली.
यात अकरावीच्या प्रवेशाबाबत एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.
अकरावीच्या प्रवेशासाठी CET (Common Entrance Test) म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती होती. त्यानुसार आता राज्याच्या शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाच्या CET परीक्षेबाबतची माहिती देण्यात आली आहे.
आजच्या शालेय शिक्षण मंडळाच्या पत्रकार परिषदेत या परीक्षेबद्दल माहिती देण्यात आली आहे.
शालेय शिक्षण मंडळाच्या म्हणण्यानुसार, ही परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी नसून ज्यांना अकरावीत प्रवेश घ्यायचा आहे आणि जे विद्यार्थी ही परीक्षा देऊ इच्छितात अशांसाठी आहे.
ही परीक्षा साधारणतः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा त्यानंतर घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
