शिवसेनेचे मंत्री अनिल परब वादाच्या भोवऱ्यात!
दहा कोटी रुपयांच्या रिसॉर्ट ची खरेदी विक्री प्रकरण
सचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)
महा विकास आघाडी सरकार मध्ये असलेले शिवसेनेचे परिवहन व संसदीय कार्य मंत्री अनिल परब वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत,त्यांच्यावर दापोली लगत मुरुड समुद्र किनाऱ्यावर दहा कोटी रुपयांच्या किमतीचे रिसॉर्ट खरेदी विक्री चे प्रकरण “राजकीय वर्तुळात” चर्चेला आले आहे,त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मंत्री अनिल परब हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे सहकारी आहेत.आज शिवसेनेत व मंत्री मंडळातील सर्व च खात्यात त्यांचा हस्तक्षेप वाढला आहे.त्यामुळे त्यांच्यावर राज्य मंत्रिमंडळातील व शिवसेना पक्षातील सहकारी त्यांचे वर नाराजी व्यक्त करत आहेत,आणि अशातच त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुराव्यासह रिसॉर्ट प्रकरणावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.
विभास साठे नावाच्या व्यक्तीकडून साधारणतः एक कोटी रुपयांना बेचाळीस गुंठे जमीन खरेदी केली आहे.ही जमीन स्वतः अनिल परब यांनी स्वतः च्या नावावर करून घेतली आहे, हा व्यवहार 19जून2019 ला झालेला आहे,
त्यानंतर सातच दिवसात मंत्री अनिल परब यांनी दापोली तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत मुरुड यांच्याकडे तीन मजली व 22खोल्या बांधकाम असलेल्यांची नोंद घेऊन त्याचा कर आकारून असेस्टमेंट उतारा देण्याची मागणी पत्र या ग्रामपंचायतीस अनिल परब यांनी स्वतः दिले आहे,
वास्तविक पाहता मंत्री अनिल परब यांनी 19जून2019 ला जामीन खरेदी केली आणि 26जून2019 ला ग्रामपंचायतीला तीन मजली व 22खोल्यांचे बांधकाम ची नोंद घेण्याबाबत चा अर्ज दिला,साधारणतः या सात दिवसातच जमिनी ची खरेदी करणे,ती नावावर होऊन त्याचा सात बारा उतारा मिळणे,आणि याच सात दिवसातच तीन मजली व 22खोल्यांचे बांधकाम पूर्ण करून त्याची ग्रामपंचायत ला नोदविणे ह्या सर्व बाबी विचाराती व नियोजन पूर्वक व लोकांना लोकप्रतिनिधींना सहजासहजी पटणाऱ्या वाटत नाहीत.या सर्व बांधकाम सात दिवसातच पूर्ण होऊ शकते त्याबाबत बांधकाम व्यावसायिक यानाच शंका आहे त्यामुळे मंत्री अनिल परब यांनी हे कसे शक्य केले,की विनापरवाना बांधकाम केले होते यावर तर्क वितर्क सुरू आहेत.
विशेष म्हणजे जमीन गट नंबर 446मध्ये बांधकाम पूर्ण करण्या आधी जमीन सात बारा वर अकृषिक(नॉन अग्रिकलचर )ची नोंद करण्यात आलेली नाही.
मंत्री अनिल परब वादाच्या केंद्रस्थानी:-
मंत्री अनिल परब यांनी साधारणतः सात दिवसातच जमिनी खरेदी करून तीन मजली इमारत,22 खोल्यासहित “रिसॉर्ट”बांधून तिची ग्रामपंचायत ला नोंद करून परत ते अठरा महिन्याच्या आत सदानंद कदम यांना हे रिसॉर्ट विकण्याचा करार करतात.हे रिसॉर्ट 21 फेब्रुवारी 2020 ला मंत्री अनिल परब यांनी सदानंद कदम यांचे नावे केले.
सी आर झेड च्या नियमांचे उल्लंघन करून रिसॉर्ट बांधकाम केल्याचा आरोप मंत्री अनिल परब यांच्या वर होतो आहे.
