“प्राण जाय पर पाणी न जाय”- काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेचा राज्यसरकारला इशारा
उजनीच्या पाच टीएमसी पाण्यावरून आक्रमक
सचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)
राज्य सरकारने उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील गावांना देण्याचा निर्णय घेतला असेल पण इंदापूर ला सोलापूर जिल्ह्यातील वाटणी चे पाणी जाऊ देणार नाही.”प्राण जाय पर पाणी न जाय”असा सणसणीत इशारा सोलापूर मध्य च्या काँग्रेस पक्षा च्या युवा आमदार प्रणिती शिंदे यांनी दिला आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांच्या या आक्रमक इशाऱ्या वरून काँगेस व राष्ट्रवादी काँग्रेस असा वाद पेटण्याची शक्यता आहे.
उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी राज्य मंत्रीमंडळातील मंत्री व सोलापूर चे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतःच्या इंदापूर या मतदार संघात नेण्यासाठी निर्णय करून घेतला आहे असा आरोप सोलापूर जिलह्यातील सर्व आमदारांनी केला आहे.
सोलापूर च्या हक्काचे एक थेंब पाणी नेऊ देणार नाही असे स्पष्ट करत जून, ते ऑगस्ट या तीन महिन्यांत एक दिवसाआड पाणी आम्हास पाहिजे,आणि आमचा हा हट्ट असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.सांडपाण्याच्या नावाखाली उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर ला नेण्याचा घाट केल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
उजनी धरणातील पाणी इंदापूर ला वळविल्यास सोलापूर जिल्हयातील शेतकऱ्यांचे उसाचे क्षेत्र कमी होऊ शकते, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कारखानदार व आमदारांनी या निर्णयास आव्हान देऊन विरोध केला आहे.
खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा विरोध:-
माढा लोकसभा मतदार संघातील खासदार रणजितसिह निंबाळकर यांनीही उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर ला नेण्या संदर्भात विरोध दर्शिवला. जिल्ह्यातील दोन खासदार व आमदारांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले जाणार असून पवारांच्या या “डाके वृत्तीबद्दल”मुख्यमत्र्यांजवळ निषेध व्यक्त करणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
