Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/class-wp-http-encoding.php on line 1
लाखेवाडी येथे कृषीदुतांचे आगमन ! शेतकऱ्यांना करणार शेतीविषयी मार्गदर्शन - संपादक :- शहाजीराजे भोसले
Mon. Jun 8th, 2026

लाखेवाडी येथे कृषीदुतांचे आगमन ! शेतकऱ्यांना करणार शेतीविषयी मार्गदर्शन

Spread the love

लाखेवाडी येथे कृषीदुतांचे आगमन ! शेतकऱ्यांना करणार शेतीविषयी मार्गदर्शन

screenshot 20241201 063432 photos

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

लाखेवाडी ता. इंदापूर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, संलग्नित असलेल्या अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी ‘कृषिदूत’ म्हणून लाखेवाडी येथे दाखल झाले आहेत. ते लाखेवाडी येथे 10 आठवडे वास्तव्य करून शेतकऱ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

या बरोबर विविध शेतीविषयक कार्यक्रमांचे आयोजन देखील करणार आहे.त्याच अंतर्गत त्यांनी गावामध्ये स्वागत समारंभाचे आयोजन केले .ग्रामपंचायत लाखेवाडी सभागृहामध्ये स्वागत समारंभ पार पडला. कृषिदूतांनी उपस्थित शेतकरी, ग्रामस्थांना कार्यक्रमाबाबत माहिती सांगितली. यामध्ये शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची ओळख, मातीपरीक्षण, पीक प्रात्यक्षिके, शेतकऱ्यांच्या समस्या व त्यांचे निवारण, शेतकऱ्यांची गरज ओळखून मार्गदर्शन आदींबाबत मार्गदर्शन केले.

त्यामध्ये त्यांनी ग्रामस्थांना रोपे देऊन त्यांना पुढील प्रात्यक्षिकांना प्रतिसादासाठी आवाहन केले . कृषिदूत अथर्व साळुंखे, प्रतिक मोरे, आनंद धर्माळे, प्रतिक सदाफळ,श्रेयस भोसले, रुद्र कुतवळ , अनुराग वळवी, वेंकट वैभव यांनी सरपंच सौ. चित्रलेखा ढोले,उपसरपंच सौ. चंदाराणी जामदार आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य , ग्रामसेवक तसेच सर्व ग्रामस्थांचे स्वागत करण्यात आले. त्या सर्वांनी कृषीदुतांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड आणि प्रा. एस. व्ही बुरुंगले यांचे मार्गदर्शन या कृषिदूतांना होत आहे

Related Post

error: Content is protected !!