Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांची “ईडी”चौकशी करण्याची शक्यता ! सूत गिरणीतील गैरव्यवहार व शेतकऱ्यांच्या नावे उचललेल्या कर्जाची चौकशी – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांची “ईडी”चौकशी करण्याची शक्यता ! सूत गिरणीतील गैरव्यवहार व शेतकऱ्यांच्या नावे उचललेल्या कर्जाची चौकशी

राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांची “ईडी”चौकशी करण्याची शक्यता ! सूत गिरणीतील गैरव्यवहार व शेतकऱ्यांच्या नावे उचललेल्या कर्जाची चौकशी

सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे बबनराव शिंदे यांची आता ईडी चौकशी करण्याची शक्यता आहे.

माढा येथील सूत गिरणीतील गैरव्यवहार आणि साखर कारखान्यातील ऊस उत्पादक सभासदांच्या नावे उचललेल्या कर्जप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.हे कारण पुढे आले आहे,सोलापूर जिल्ह्यात याची जोरदार चर्चा सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात ईडीची ही पहिलीच कारवाई आहे.

साखर कारखानदारीतील राष्ट्रवादीचे मोठे नेते आमदार बबनराव शिंदे यांची ओळख आहे.त्यांचे सुपुत्र आणि जिल्हा दूध संघाचे नूतन अध्यक्ष रणजीतसिंह शिंदे यांच्या सहकारी तसेच खासगी संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहाराचा संशय आहेत. याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी सूतगिरणीच्या व्यवहारात गैरव्यवहार केला असल्याची तक्रार उपळाईचे सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम यांनी केली होती. त्या अनुषंगाने चौकशी सुरू झाली असून आमदार शिंदे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.

आमदार शिंदे यांच्या कारखान्यासंदर्भात अशाच प्रकारची दुसरी एक तक्रार टेंभुर्णीतील भाजप माजी आणि आता शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांनी केली होती.

महत्वाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांच्या नावे परस्पर उचललेल्या कर्जाचे प्रकरण आहे.हे प्रकरण गंभीर असल्याची चर्चा आहे.

या दोन्ही तक्रारींची दखल घेत ईडीने आता एकत्र चौकशी सुरू केली असून जबाबाच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *