Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
परिवहन मंत्र्यांचा महामंडळातला सचिन वाझे कोण? ; गोपीचंद पडळकरांचा संतप्त सवाल – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

परिवहन मंत्र्यांचा महामंडळातला सचिन वाझे कोण? ; गोपीचंद पडळकरांचा संतप्त सवाल

परिवहन मंत्र्यांचा महामंडळातला सचिन वाझे कोण? ;
गोपीचंद पडळकरांचा संतप्त सवाल

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

मोठ्या विश्वासानं महाराष्ट्रातला प्रवासी आजही एस.टी.ने प्रवास करतो.
पण आपल्या त्यागाने व सेवेने एस.टी. महामंडळला मोठं करणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांवरच आत्महत्येची वेळ यावी,
ही राग आणि अपमान वाटणारी बाब आहे,
अशी टीका भा.ज.पा. नेते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
एकतर तुटपुंजा पगार, त्याचाही वेळेवर पत्ता नाही.
ठाकरे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष उलटत आली पण कर्मचाऱ्यांचे वेतन करार अजून झाले नाहीत.
महामंडळाला आवश्यकता नसणाऱ्या गोष्टीसाठी हजारो कोटीचे टेंडर काढ़ून खाजगी कंत्राटदारांची संपूर्ण देणी दिली जातात.
पण कर्मचाऱ्यांचे मूलभूत पगार दिले जात नाहीत.

हे सर्व कुणाच्या टक्केवारीसाठी चाललंय?
परिवहन मंत्र्यांचा महामंडळातला सचिन वाझे कोण ?
असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला.
या सर्व विरोधात ज्या युनियनने आवाज उठवायला पाहिजे तेच आज प्रस्थापितांच्या तालावर नाचत आहेत.
पण माझं सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांना आव्हान आहे की आपण कुठल्याही दबावाला न झुकता आपल्या हक्कासाठी लढा उभारा.
मी तुमच्या पाठीशी खंबरीपणे उभा आहे.
राज्य सरकारकडं मागणं आहे की जे राज्य कर्मचाऱ्यांना तेच एस.टी. कामगारांना द्या,
अन्यथा संघर्ष अटळ आहे,
असंही ते म्हणाले आहेत.
या लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या २१ सप्टेंबरला झरे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
आपण तिथे जास्त संख्येनं यावे असे आवाहनही त्यांनी केले.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *