Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
मोदी सरकार”च्या मंत्रिमंडळात कोणत्या राज्याना प्रतिनिधित्व मिळणार? – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

मोदी सरकार”च्या मंत्रिमंडळात कोणत्या राज्याना प्रतिनिधित्व मिळणार?

“मोदी सरकार”च्या मंत्रिमंडळात कोणत्या राज्याना प्रतिनिधित्व मिळणार?

सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क )

येत्या आठ जुलै ला केंद्रीय मंत्री मंडळाचा विस्तारची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे,या मंत्रिमंडळात कोणत्या राज्याना किती प्रमाणात प्रतिनिधित्व मिळणार आणि कोणत्या खासदारांना संधी मिळणार याबाबत राजकीय धुरांधरांचे लक्ष लागून राहिले आहे.

लवकरच उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक असणाऱ्या या राज्याला तीन ते चार मंत्रीपद मिळू शकतात.

या मध्ये जनयामध्ये अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांनाही संधी मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे.

बिहार राज्यातील जनता दल युनायटेडमधून आर. सी. पी. सिंह आणि संतोष कुशवाह किंवा ललन सिंह यांच्यापैकी एखाद्या नेत्याची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते,तसे प्रतिनिधित्व देऊन मित्र पक्षाला ते संधी देऊन राजकीय मजबुतीकरण करण्यावर भर आहे.

मध्य प्रदेशमधून काँग्रेस मधून भाजप मध्ये प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य शिंदे , मध्यप्रदेश चे भाजपाचे माजी अध्यक्ष आणि जबलपुरचे खासदार राकेश सिंह यांचाही मंत्री मंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रामधून माजी मुख्यमंत्री नारायण राणेंबरोबरच काँग्रेसमधून भाजपात आलेल्या माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजीत नाईक निंबाळकर आणि हिना गावित यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामधील बीडच्या खासदार व माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची कन्या डॉ. प्रितम मुंडे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणाऱ्या उदयनराजे भोसले यांच्या नावाचीही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.

आसाम राज्यात भाजपाचा मित्र पक्ष असणाऱ्या आसाम गण परिषदलाही मंत्रीपद दिलं जाऊ शकतं. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधील मतुआ समाजाचे शान्तनू ठाकूर आणि अनुसूचित जाती जमातींमध्ये मोठा प्रभाव असणाऱ्या निशीथ प्रामाणिक यांचाही मंत्री मंडळात समावेश होऊ शकतो.

लडाखमधील भाजपाचे खासदार जाम्यांग शेरिंग नाम्ग्याल यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

तसेच ओदिशा, राजस्थान आणि जम्मू काश्मीरमधील एक दोन नेत्यांना केंद्रांत संधी मिळू शकते.अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *