Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/class-wp-http-encoding.php on line 1
रेडणी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस - संपादक :- शहाजीराजे भोसले
Mon. Jun 8th, 2026

रेडणी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

Spread the love

रेडणी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

सचिन तरंगे(शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)

मे महिन्याच्या अखेरीस रेडणी व लगतच्या गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला,त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील उभ्या पिकाना जीवदान मिळाले आहे.त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे,एकंदरच बळी राजा सुखावला आहे.
उन्हाळी हंगामातील विविध पिके शेतकरी घेत असतो,सद्या ऊस बांधणी जोरात सुरू असल्याने पाऊसाचा फायदा झालाच आहे.
परंतु अचानक आलेल्या या पावसामुळे गुराखी,मशागत करणारे शेतकरी,मजूर यांची तारांबळ उडाली.
ऊस,कडवल,या पिकांना फायदा झाला तर डाळिंब,आंबा ,या पिकाचे नुकसान झाले.
अचानक आलेल्या वादळी वाऱ्या मुळे तोंडले या वेलवर्गीय भाज्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले,या पिकासाठी केलेले मांडव भुईसपाट झाल्याने आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे.यामुळे शेतकरी हतबल झाला आहे तर ऊस, कडवळ या पिकांना फायदा झाल्याने काही शेतकऱ्यांत उत्साह दिसून आला.

Related Post

error: Content is protected !!