Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
बाबीर बुवाच्या गुलालाची शप्पथ आता काहीही झालं तरी माघार नाही’, प्रवीण मानेंनी रणशिंग फुंकलं! – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

बाबीर बुवाच्या गुलालाची शप्पथ आता काहीही झालं तरी माघार नाही’, प्रवीण मानेंनी रणशिंग फुंकलं!

बाबीर बुवाच्या गुलालाची शप्पथ आता काहीही झालं तरी माघार नाही’, प्रवीण मानेंनी रणशिंग फुंकलं!

screenshot 20241024 040829 instagram
इंदापूरातील हाय होल्टेज राजकीय वातावरण.

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण (भैय्या )माने म्हणाले, ‘आजवर तुम्ही हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांना संधी दिली आहे. मला एकदा पाच वर्षे संधी देऊन बघा. तुमचा सेवक म्हणून मी काम करेल. शाहू-फुले आंबेडकर यांच्या विचाराचा तालुका आपण निर्माण करून दाखवू. स्व. शंकररावं पाटील, स्व. राजेंद्रकुमार घोलप, गोकुळदास शहा यांच्या विचारावर आपणास पुढे जायचे आहे.

इंदापूर तालुक्याचा १९९५ सालचा इतिहास पाहा. इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे, जेव्हा तिरंगी लढत होते. तेव्हा जो उमेदवार अपक्ष उभा राहतो, तेव्हा तो इंदापूर तालुक्यातून निवडून येतो हा इतिहास आहे. लोकांनी सांगितलं आहे आता जर माघारी घेतली तर तुमचा नंबर डिलीट करून टाकू.’

प्रवीण माने पुढे म्हणाले, ‘ आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने थोड्या वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहे. परिवर्तनाच्या लढाईत समोर बसलेला प्रत्येक माणूस आमदार आहे, हे लक्षात ठेवा. मी एकटा आमदार होणार नाही. आज सकाळी बाबीर बुवाला नारळ फोडून नतमस्तक झालो.

बाबीर बुवाचा गुलाल घेऊन आलोय. या गुलालाची शप्पथ घेऊन सांगतो, की तुमच्या पाठिंब्यामुळेच मी आज विधानसभेला अर्ज भरत आहे. त्यामुळे काहीही झालं तरी मी दाखल केलेला अर्ज काढणार नाही’,असं म्हणत प्रवीण माने यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.

माझे वडील नेहमी म्हणायचे की देवाच्या आशीर्वादाने आपं खूप चांगलं आहे. पण बेटा, तू माणसं कमावं. जेव्हा संकटं आली तेव्हा हीच जनता धावून आली. निवडणुका येतील आणि जातील, पण कोणाला दुखवू नका. दारात जाऊ, पाया पडू, जनतेने आशीर्वाद दिल्यास सेवक म्हणून काम करू. जनतेने निवडणुका स्वत:च्या हातात घेतल्यास काय होते ते लोकसभेला पाहिलं आहे, असं माने म्हणाले. माने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यानं इंदापूरमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे.
आजच्या सभेस धनगर समाजबहुसंख्येने उपस्थित होता.

बाबीर देवस्थान -धनगर समाजाचं श्रद्धास्थान

इंदापूर तालुक्यातील रुई गावात बाबीर देवस्थान आहे, ते धनगर समाजाचे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्र राज्या बरोबर कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यातून लाखो भाविक या ठिकाणी येतात.

Related Post