Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
कर्मयोगी व निरा भिमाकडून शेतकरी व कामगारांची दिवाळी गोड – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

कर्मयोगी व निरा भिमाकडून शेतकरी व कामगारांची दिवाळी गोड

कर्मयोगी व निरा भिमाकडून शेतकरी व कामगारांची दिवाळी गोड

screenshot 20241022 225525 whatsapp

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क ) प्रदिप तरंगे

वालचंदनगर, दि.२२ : इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी सहकारी साखर कारखाना व निरा भिमा सहकारी साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांना दोनशे रुपयांचा दुसरा हप्ता देणार असल्याचे राजवर्धन पाटील यांनी जाहीर केले. तसेच कामगारांना एक महिन्याचा पगार दिवाळी बोनस म्हणून देण्यात येईल असेही त्यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. यावेळी निरा भिमा साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, विलास वाघमोडे, कर्मयोगी व निरा भिमा साखर कारखान्याचे संचालक मंडळ उपस्थित होते.

निरा भिमा व कर्मयोगी कारखान्यांना जाणून-बुजून बदनाम केले जाते, परंतु आता कारखाने अडचणीतून बाहेर आले आहेत. इंदापूर तालुक्यात तिसरा सहकारी साखर कारखाना असलेल्या छत्रपती कारखान्याची वार्षिक सभा देखील मागील दोन वर्षात झाली नाही, तसेच निवडणूक ही अनेक वर्षांपासून घेण्यात आली नाही मग ही कसली लोकशाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

Related Post