Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पुणे जिल्हा आयोजित नमो प्रतियोगिता कबड्डी स्पर्धा तावशी येथे संपन्न – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पुणे जिल्हा आयोजित नमो प्रतियोगिता कबड्डी स्पर्धा तावशी येथे संपन्न

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पुणे जिल्हा आयोजित नमो प्रतियोगिता कबड्डी स्पर्धा तावशी येथे संपन्न

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आयोजित नमो प्रतियोगिता कबड्डी स्पर्धा तावाशी इथे आयोजित करण्यात आल्या होत्या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री मा. हर्षवर्धनजी पाटील , गणेशजी भेगडे अध्यक्ष किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांचे हस्ते व भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

या स्पर्धेला जिल्ह्यातून अनेक नामांकित संघ सहभागी झाले होते,
यामध्ये प्रथम पारितोषिक रोख रक्कम 31 हजार रुपये व चषक विजेते राणा प्रताप कळंब , द्वितीय बक्षीस रोख रक्कम 21 हजार रुपये व चषक भालचंद्र निंबाळकर संघ भवानीनगर व तृतीय बक्षीस ११ हजार रुपये व चषक जयंत स्पोर्ट्स इस्लामपूर यांनी पटकावले.

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा यांच्या शीर्ष नेतृत्वाच्या व पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून देशी खेळांना प्रोत्साहन मिळावे व त्यामधून राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू तयार व्हावेत त्यांना संधी मिळावी हा मुख्य उद्देश समोर ठेवून किसान मोर्चा च्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्ह्यामधून श्री बाबाराजे जाधवराव, दादासाहेब सातव, जयेश शिंदे,अविनाशजी मोटे, विलास माने, करण घोलप, गोविंद देवकाते, सुजित वायसे ,सतीश फाळके, शहाजी शिंदे, शहाजी कदम, भालचंद्र निंबाळकर सर, चंद्रकांत सपकळ, रवींद्र यादव, संदीप मुलमुले, पैलवान अमरसिंह जगदाळे, हरिभाऊ ठोंबरे, संग्रामसिंह निंबाळकर, श्याम कोकरे, बाबामहाराज खारतोडे, संतोष चव्हाण, पि. के. जगताप, प्रताप रायते व अन्य मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेचे आयोजन किसान मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष तानाजी बापू थोरात,सचिन मचाले, लालासाहेब सपकळ, माऊली शेळके, सचिन भाग्यवंत व भैरवनाथ तरुण मंडळ तावशी यांनी आयोजित केले होते या प्रसंगी कबड्डी स्पर्धेबद्दल हर्षवर्धन पाटील साहेब यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला व आयोजकांचे अभिनंदन केले.

अत्यंत कमी कालावधीमध्ये स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल गणेशजी भेगडे यांनी तानाजीबापू थोरात व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन केले. स्पर्धेला खेळाडूंकडून व प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद लाभला, यावेळी वासुदेवनाना काळे यांनीही मनोगत व्यक्त केले, स्पर्धा पहाटे पाच वाजेपर्यंत मोठ्या गर्दी मधे चालू होत्या, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पहाटे पाच वाजता संपन्न झाला.

Related Post