Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
शिंदे व पवार यांच्या रस्सीखेचीत “भाजप”च्या हाती…काय ? – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

शिंदे व पवार यांच्या रस्सीखेचीत “भाजप”च्या हाती…काय ?

शिंदे व पवार यांच्या रस्सीखेचीत “भाजप”च्या हाती…काय ?

सचिन तरंगे (शिव कल्याण न्यूज नेटवर्क )

राज्यात शिंदे -फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले तोच अनपेक्षित पणे पवार या दोघांना जाऊन मिळाले, महत्वाचे म्हणजे ते सरकार मध्ये सहभागी झाले. आणि राज्यात कधी नव्हे ते एक सीएम आणि दोन डेप्युटी सीएम चे ‘मंत्रिमंडळ ‘तयार झालं.

राष्ट्रवादी ला जेम तेम तीन महिन्यानंतर पालकांमंत्रिपदे मिळाली. आणि उपमुख्यमंत्री अजित पवार का रुसले ते सर्वांच्या लक्षात आले. अजितदादा चा आजाराचा प्रयोग किमान पालकमंत्री पदे मिळविण्यासाठी कामाला आला.

पालकमंत्री पदासाठी अजितदादा रुसून बसतात, आजारी असल्याचे कारण सांगून कॅबिनेट ला गैरहजर राहतात.

शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी सातत्याने पालकमंत्रिपदांची मागणी लावून धरली होती. गेल्या काही दिवसांपासून तर ते नाराजी जाहीरपणे दाखवत होते. आजारपण वारंवार उफाळून येत असल्याने ते सरकारच्या कार्यक्रमांना उपस्थित राहात नव्हते.

कालच्या मंत्रिमंडळ बैठकीलाही अजित पवारांनी दांडी मारली आणि त्याची चर्चा सुरू झाली.

अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन नेतृत्वाशी चर्चा करून पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. मात्र त्याच वेळी देवगिरी वर मात्र राष्ट्रवादी च्या मंत्र्यासोबत बैठक घेतात.

शिंदे -फडणवीस यांची नैसर्गिक युती महाराष्ट्र समजू शकतो मात्र अजित पवार यांच्या बरोबर ची युती चे समीकरण लक्षात येतच नाही. पवाराबरोबर ची युती भाजप ची अपरिहार्य ता आहे.

राज्यात आपण बॉस असल्याचे सांगणाऱ्या भाजपला मात्र पवारांचे हट्ट पुरवता पुरवता अक्षरशः नाकीनऊ आले आहेत.

पुणे शहरात आणि इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यात स्वतः नुकसान सोसून राष्ट्रवादी ला बळ देण्याची भाजप ची रणणिती “इंदापूर चे पाटील, पुरंदरचे शिवतारे, आणि दौंड चे कुल “यांचे राजकीय भवितव्य वेठीस धरण्याचं कि उध्वस्त करण्यासाठी असणार हे मात्र ‘लोकसभेच्या निवडणूकीत च लक्षात येईल.

अजित दादांचा पुण्याच्या पालकमंत्री पदाचा हट्ट हा भाजप वर ‘लगाम ‘आहे, त्यासाठी पुण्यातून तीव्र विरोध होता. मात्र दादांचा रुसवा त्या कामी आला.

अजितदादा रुसले, पालकांमंत्रिपदे मिळवून घेतली.अजितदादांनी वेठीस धरून पालकमंत्रिपदे मिळविली, भविष्यात पवार असेच वेठीस धरू शकतात, याची जोरदार चर्चा भाजप च्या केंद्रीय वर्तुळात आहे. त्या राजकीय घडामोडी मुळे केंद्रातील आणि राज्यातील भाजप चे वाजनदार आणि मुस्तद्दी नेते सावध झाले आहेत.

पुण्याचं पालकमंत्री पद गेल्याने चंद्रकांत दादा तात्काळ मुख्यमंत्री शिंदे यांना भेटले, पुण्याचं सह पालकमंत्री पद पदरात पाडून घेतलं.पुण्याच्या डीपीसी माध्यमातून देण्यात येणाऱ्या शहर व ग्रामीण च्या कोट्यावधी निधीचे गुणोत्तर सीएम शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस व पवार ठरविना र आहेत, त्यामुळे भविष्यात हा निधी शिंदे -भाजप -पवार असा वाटप होणार आहे.

मात्र तरीही पुण्यात व जिल्ह्यात शिंदे -पवार यांच्या रस्सीखेचीत भाजप च्या हाती काय लागणार ? कि, हाती लागण्याची वाट पाहावी लागणार, हेच पाहावे लागेल, तो पर्यंत पुणे, शिरूर आणि बारामती लोकसभेची निवडणूक लागेल.

Related Post