Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
उमेद अभियानामार्फत राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट स्पर्धेचे आयोजन – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

उमेद अभियानामार्फत राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट स्पर्धेचे आयोजन

उमेद अभियानामार्फत राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट स्पर्धेचे आयोजन

विजेत्याला ३ लाख रुपयाचे बक्षीस

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

मुंबई ८- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट आणि चित्रफित निर्मितीच्या स्पर्धेचे आयोजन दिनांक १ जून ते ३० जून पर्यंत करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असल्याकारणाने या स्पर्धेसाठी व्यावसायिक, हौशी चित्रपट निर्माते, व्हिडीओ निर्माते व युट्यूब ब्लॉगर यांना सहभागी होता येणार आहे.
राज्यस्तरावर निवड होणाऱ्या स्पर्धकासाठी प्रथम पारितोषिक ३ लक्ष रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय २ लक्ष रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय १ लक्ष रुपये व सन्मानचिन्ह व उत्तेजनार्थ ५० हजार रुपये व सन्मानचिन्ह सोबतच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रात सन २०११ पासून व जिल्ह्यात सन २०१८ पासून इंटेन्सिव्ह पद्धतीने दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) या नावाने अंमलबजावणी केली जात असून महिला स्वयं सहायता समूहांच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. या माध्यमातून अनेक गरीब कुटुंबांच्या जीवनमानात फरक पडला आहे. या यशोगाथाना दृकश्राव्यमाध्यमातून चित्रित करण्यासाठी राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट आणि चित्रफित निर्मिती स्पर्धा १ जून ते ३० जून दरम्यान आयोजीत करण्यात आली आहे.
स्पर्धकांनी जिल्हास्तरावर १५ जून पर्यंत चित्रफित सादर करावी. जिल्हास्तरावर सहभागी एकूण स्पर्धकापैकी उत्कृष्ट ५ स्पर्धकांना जिल्हा कक्षाकडून सन्मानपत्र देण्यात येईल. तसेच त्यांचे चित्रफिती राज्यकक्षाकडे पाठविण्यात येतील व ३० जून पर्यंत अंतिम निवड प्रक्रिया पार पडेल. चित्रफितीचा कालावधी जास्तीत जास्त ७ मिनिट असावा. दर्जा उत्तम (HD) असावा, चित्रफित अप्रकाशित असावी.
लघुपट निर्मितीत व्यावसायिक, हौशी, स्वयं सहायता समूह, ग्राम संघ, प्रभाग संघ, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, यांच्या सह सर्वसामान्य नागरीकांनाही या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. स्पर्धेचे विषय, नियम, प्रवेश अर्ज व इतर माहितीसाठी इच्छुकांनी संबंधित जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, उमेद जिल्हा परिषद व संबंधित तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत, समिती यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
या स्पर्धेमुळे राज्यातील स्वयंसहायता गटांच्या यशकथा दृकश्राव्य स्वरूपात समोर येण्यास मदत होणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्यासाठीचे आवाहन उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर आणि अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांनी केले आहे.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *