Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
खत कंपन्यांनी शेतकरी हिताचा विचार करावा – वासुदेव (नाना) काळे – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

खत कंपन्यांनी शेतकरी हिताचा विचार करावा – वासुदेव (नाना) काळे

खत कंपन्यांनी शेतकरी हिताचा विचार करावा – वासुदेव (नाना) काळे

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

दि.9 : स्मार्टकेम टेक्नॉलॉजी लिमिटेड,पुणे महाधन व सोनाली फर्टीलायझर्स, मानकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पीक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी किसान मोर्चा भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे म्हणाले की, खत कंपन्यानी शेतकर्यांच्यऻ हिताचा विचार करून माती व पाणी परीक्षणासाठी शेतकऱ्याला प्रशिक्षित करावे, अनेक वर्ष शेतकऱ्याला हक्काचे मार्केट मिळाले नाही. केंद्र सरकारने भाजपाच्या S.M.P प्रमाणेच F.R.P सुधा बंधनकारक केल्यामुळे साखर कारखान्यांचा व शेतकऱ्यांचा फायदा झाला. या वेळी शेतकऱ्यांशी हितगुज करण्यात आल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले.

यावेळी ऊस पिकावरती खत व्यवस्थापन या विषयी मा. श्री बिपिन चोरगे साहेब ऊस तज्ञ झोनल मार्केटिंग मॅनेजर (महाधन) यांनी यावेळी योग्य पद्धतीने शेतकऱ्यांनी खते कशी द्यावित यावर आतिशय चांगले मार्गदर्शन केले महाधन क्राॅपटेक हे शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे योग्य संतुलित ऊस पीकाचा आहार आहे हे सांगितले.

या कार्यक्रमाचे निमंत्रक तानाजी (बापू) थोरात यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊस पीक परिसंवाद, नॅनो टेक्नॉलॉजी, शेतकरी मेळावे, शेतकरी प्रशिक्षण शिबीरे, माती व पाणी परीक्षण कार्यशाळा अशी आनेक शेतकरी हिताचे कार्यक्रम राबवित असल्याचे सांगितले. सोनाली फर्टीलायझर्स च्या माध्यमातुन परिसरातील शेतकऱ्यांना खते, औषेधॆ व बि-बियाणे चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिली जातात.जयराज इरिगेशन सिस्टीमच्या मद्यमातून एकाच छताखाली शेतकऱ्याला सर्व साहित्य माफक दरामध्ये उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांचा वेळ व पैसा दोन्हीही बचत होत असल्याचे सांगितले
यावेळी मंडल कृषी अधिकारी विक्रम वागमोडे यांनी शासनाच्या योजना विषयी माहिती दिली. महाधन कंपनीच्या वतीने रविराज वागमोरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूराव यादव मा. संचालक श्री. छ.स. सा.का.भवानीनगर यांनी भूषविले यावेळी विविध क्षेत्रांमध्ये विक्रमी उत्पन्न काडलेल्या शेतकरयांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमास विलास (आण्णा) माने,विश्वासराव रुपनवर पाटील, रवींद्र यादव, पोपट चव्हाण,माणिकराव भोसले, हनुमंत थोरात,दिलीप थोरात, दिलीप पांढरे, सचिन भाग्यवंत, लालासाहेब सपकळ, अमरसिंह कदम, तानाजी जाधव, बापूराव पांढरे, विठ्ठल थोरात, अंकुश रणमोडे,शिवाजी रुपनवर,महेश चव्हाण, अॅड विजय पांढरे, व्हाईस लेफ्टनंट अवधूत पांढरे, पत्रकार रियाज सय्यद यांसह प्रचंड संख्येने शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आनील रुपनवर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन योगेश थोरात यांनी मानले व अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *