इंदापूर नगरपरिषदेसमोर पत्रकार संघाचे बेमुदत धरणे आंदोलन ,
इंदापूर पत्रकार भवन जागेचा वाद चिघळणार
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
गेल्या अनेक वर्षापासुन इंदापूर शहर पत्रकार संघाने इंदापूर नगरपरिषदेकडे पत्रकार भवन इमारत बांधकामासाठी लेखी अर्जाद्वारे जागा व निधीची मागणी केलेली आहे.परंतु अद्यापपर्यंत पत्रकारांना आश्वासना व्यतीरिक्त काहींच मिळाले नाही.पत्रकार भवनच्या जागेबाबत नगरपरिषद प्रशासन व सत्ताधारी यांचेकडुन पत्रकारांच्या मागणीबाबत जाणीवपुर्वक व राजकिय द्वेषभावनेतुन दुर्लक्ष केले जात असल्याने पत्रकार भवन जागेच्या प्रश्नासंदर्भात न्याय मिळण्यासाठी मंगळवार दिं.१८ जानेवारी २०२२ रोजीपासुन इंदापूर नगरपरिषद कार्यालयासमोर शासकिय वेळेत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार सुधाकर बोराटे व प्रकाश आरडे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
दि.२७ सप्टेंबर २०२१ रोजी इंदापूर नगरपरिषदेकडे पत्रकार भवनच्या जागेसाठी इंदापूर शहर पत्रकार संघाने लेखी अर्ज दिला होता.इंदापूर शहर पत्रकार संघाला जागा देण्या संदर्भातील अर्जावर २८आक्टोंबर २०२१ रोजीच्या सर्वसाधारण सभेत ठराव नं.२०६८ व विषय न.९५ याबाबत सभेत सर्वानमते चर्चा होऊन पत्रकार संघाला जागा देणेबाबतचा ठराव सर्वानुमते नगराध्यक्षा अंकिता शहा ( अध्यक्ष ) यांचे सहीने मंजुर झाला.पण सदर ठरावामध्ये अध्यक्षांनी जाणीवपुर्वक तांत्रीक अडचण निर्माण करून ठराव मंजुर केल्याने पत्रकार भवनचा मुद्दा पुन्हा रेंगाळत ठेवुन ठरावास मान्यता देणारे सर्व नगरसेवक व पत्रकारांची फसवणुक केली ह बाब निंदनीय आहे.
मंजुर ठरावात जाणीवपूर्वक राजकिय हेतुने त्रुटी (अडचण) निर्माण करून ठराव तयार करण्यात आला आहे.त्यामुळे पत्रकार भवनसाठी जागा मिळणे दुरापास्त झालेले आहे. व इंदापूर पत्रकर संघाची वारंवार फसवणुक व करून वेळकाढुपणा होत असल्याने इंदापूर पत्रकार संघाला टोकाची भुमीका घ्यावी लागत आहे.नगरपरिषद प्रशासनाने सदर ठरावातील त्रुटी दुरूस्त करून तात्काळ पत्रकार भवनसाठी जागा उपलब्ध करून द्यावी व इमारत जागा व बांधकामासाठीचा दीलेला शब्द पुर्ण करण्यात करण्याची मागणी इंदापूर पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली असुन इंदापूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवानी मंगळवारी धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन इंदापूर पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
चौकट –
इंदापूर नगरपरिषदेतील विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी इंदापूर नगरपरिषद हद्दीतील जेष्ठ नागरिक संघाच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर पत्रकार भवनसाठी दोन मजले बांधकाम करण्याच्या ठरावाला सर्वानुमते मंजुरी दिलेली असताना नगराध्यक्षांनी मात्र त्यामध्ये तांत्रीक अडचण निर्माण करून पत्रकार भवनच्या जागेच्या प्रश्नाला पुन्हा एकदा जाणीवपुर्वक खो दिल्याने पत्रकार संघाची फसवणुक केली असुन या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्विकारून नगराध्यक्षांनी तात्काळ राजीनामा द्यावा….इंदापूर पत्रकार संघ.

इंदापूर नगरपरिषदेसमोर पत्रकार संघाचे बेमुदत धरणे आंदोलन ,