Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
पत्रकार संघाच्या वतीने स्त्रीशक्तीचा सन्मान आदर्श निर्माण करणारा – दत्तात्रय भरणे जिजाऊ, सावित्रीच्या दोनशे लेकींचा झाला सत्कार – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

पत्रकार संघाच्या वतीने स्त्रीशक्तीचा सन्मान आदर्श निर्माण करणारा – दत्तात्रय भरणे जिजाऊ, सावित्रीच्या दोनशे लेकींचा झाला सत्कार

पत्रकार संघाच्या वतीने स्त्रीशक्तीचा सन्मान आदर्श निर्माण करणारा – दत्तात्रय भरणे
जिजाऊ, सावित्रीच्या दोनशे लेकींचा झाला सत्कार

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

मराठी पत्रकार परिषद संलग्न इंदापूर मराठी पत्रकार संघाच्या वतीने आद्यदर्पनकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दीनानिमित्त राजमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून जिजाऊ,सावित्रीच्या लेकींना सन्मानित करून इंदापूर मराठी पत्रकार संघाने महिलांच्या प्रति आदर्श निर्मान केल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे सार्वजनीक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची १९० वी जयंती व पत्रकार दिनाचे औचित्य साधुन मराठी पत्रकार परिषद संलग्न इंदापूर मराठी पत्रकार संघाच्या वतीने राजमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीच्या अणुगाने जिजाऊ,सावित्रीच्या लेकींचा सन्मान व पत्रकार सन्मान सोहळा प्रसंगी शहरातील राधीका रेसीडेन्सि हाॅलमध्ये आयोजित कार्यक्रमात दत्तात्रय भरणे बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी पूणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, बाजार समितीचे माजी सभापती अप्पासाहेब जगदाळे,नीरा भीमाचे संचालक राजवर्धन पाटील,तहसिलदार श्रकांत पाटील,नगरपरिषद मुख्याधीकारी रामराजे कापरे, जयंतराव नायकुडे(सर), इ. उपस्थित होते.

पत्रकार दीनी दोनशे पेक्षाही जास्त महिलांचा सन्मान करून इंदापूर पत्रकार संघाने समाजामध्ये वेगळे स्थान निर्मान केल्याचे दत्तात्रय भरणे म्हणाले.६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता इंदापूर येथील राधिका रेसिडेन्सि हाॅल येथे सन्मान सोहळा संपन्न झाला.यावेळी महिलां व पत्रकारांचा फेटा बाधुन सन्मान करण्यात करण्यात आला.यावेळी महिलांना डायरी, पेन व मसाला दुधाचे वाटप करण्यात आले.यावेळीपत्रकार संघाच्या वतीने पत्रकारीता क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणारे टीवी नाईनचे रिपोर्टर राहुल ढवळे, महान्युज लाइव्हचे पत्रकार सुरेश मिसाळ,जनप्रवासचे शिवाजी पलवार यांना निर्भिड पत्रकारिता पुरस्कारानेसन्मानित करण्यात आले.

विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी करणारे युवा नगरसेवक स्वप्निल राऊत, नगरसेवक अनिकेत वाघ, दत्तात्रय सावंत (सर), आपले नेंबर आणिल पवार, संतोष आरडे, दत्तात्रय जगताप,अॅड.रणजित बाबर,दिपक गुरगूडे,अनिल भांगे,समाधान गायकवाड याना विशेष गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी नर्सिंग इन्टीट्युचे जयत नायकुडे सर यांचे विशेष योगदान लाभले.या प्रसंगी तालुक्यातील ७९ पत्रकारांचा सन्मानचिन्ह देवुन सन्मानित करण्यात आले. प्रस्ताविक पत्रकार सुधाकर बोराटे यांनी केले,सुत्रसंचलन संतोष नरूटे यांनी केले व आभार प्रकाश आरडे यांनी मानले.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *