Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
ट्रस्ट ॲाडिट दाखल करण्यास पुन्हा मुदतवाढ – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

ट्रस्ट ॲाडिट दाखल करण्यास पुन्हा मुदतवाढ

ट्रस्ट ॲाडिट दाखल करण्यास पुन्हा मुदतवाढ

  1. ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

सार्वजनिक ट्रस्ट व धर्मादाय संस्थांचे वार्षिक ॲाडिट रिपोर्ट सादर करण्यास महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी एकतीस डिसेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रक क्र. ५९२ नुसार ३१ जानेवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० व त्याअंतर्गत नियमांनुसार दरवर्षी सनदी लेखापालांकडून लेखापरीक्षण करून संपूर्ण ॲाडिट रिपोर्ट आयकर विभागाच्या पोर्टल वर ॲानलाईन सादर करावा लागतो. नियमानुसार असा लेखापरीक्षण अहवाल अपलोड झाल्यावर त्याची ॲानलाईन पोहोच प्राप्त होते. ही पोहोच व सर्व विश्वस्तांची नावे, पॅन नंबर व सही असलेल्या फॅार्म ९-ड भरावा लागतो. त्यानंतर ३० सप्टेंबर पूर्वी धर्मादाय कार्यालयाच्या वेबसाईटवर अपलोड करावा लागतो.

यावर्षी आयकर विभागाच्या पोर्टल मध्ये जून महिण्यापासून बिघाड झाला असल्याने अनेक महिने कोणताही कागदपत्रे अपलोड होत नव्हते. साहजिकच त्यामुळे सार्वजनिक ट्रस्ट व धर्मादाय संस्थांचे वार्षिक ॲाडिट रिपोर्ट आयकर विभागाच्या पोर्टलवर अपलोड न झाल्याने त्याची पोहोच मिळू शकली नाही. त्यामुळे आयकर विभागानेही मुदत वाढवली होती. त्या अनुषंगाने धर्मादाय विभागानेही मुदत यापूर्वी ३० डिसेंबर पर्यंत वाढवली होती. पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांनी धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांना ई-मेल करून कोविड काळातील प्रतिबंधांमुळे अनेक संस्थांची लेखापरिक्षणे झाली नसल्याचे निदर्शनास आणले होते व मुदतवाढीची विनंती केली होती.

या सर्व बाबींची दखल घेऊन ॲाडिट रिपोर्ट आयकर विभागाकडे व धर्मादाय विभागाच्या वेबसाईट वर अपलोड करून तेथील ॲानलाईन पोहोच व फॅार्म ९-ड सह संपूर्ण ॲाडिट रिपोर्टच्या कागदोपत्री प्रती संबंधित धर्मादाय कार्यालयांमध्ये दाखल करण्यास ३१ जानेवारी पर्यंत मुदत वाढवली आहे अशी माहिती सचिव ॲड. सुनिल मोरे यांनी दिली.
——————————————————
सर्व सार्वजनिक ट्रस्ट व धर्मादाय संस्थांनी या वाढवून दिलेल्या मुदतीत वार्षिक लेखापरीक्षण अहवाल धर्मादाय कार्यालयात सादर करावेत कारण या पुढे मुदतवाढ मिळेल असे वाटत नाही.
* ॲड. रजनी उकरंडे*
खजिनदार, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन, पुणे

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *