Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

कळंब ता. इंदापूर येथील इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय व सृजन सोशल वेल्फेअर फाउंडेशन बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका यांचे उदघाटन वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अतुल खंदारे, इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग, विश्वस्त कुलदीप हेगडे ,प्राचार्य डॉ. अंकुश आहेर , उपप्राचार्य अरुण कांबळे ,स्पर्धा परीक्षा समन्वयक प्रा डॉ विलास बुवा सृजन सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे समन्वयक विशाल भोसले ,प्रशिक्षक विशाल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले . महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या संगणक लॅबचे उदघाटन पी एस आय अतुल खंदारे यांच्या हस्ते झाले .स्पर्धा परीक्षा केंद्र अभ्यासिकेचे उदघाटन संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा समन्वयक विलास बुवा यांनी केले. संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी स्पर्धा परीक्षा केंद्रास व त्यामध्ये भाग घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत पोलीस भरती प्रशिक्षणसाठी संस्थेच्या वतीने सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले.पी एस आय अतुल खंदारे यांनी त्यांच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक अडचणींवर मात केली
असल्याचे सांगत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना जिद्द,चिकाटी,आत्मविश्वासाने ध्येय गाठून यशस्वी होत असल्याचे मत व्यक्त केले.
सृजन सोशल वेल्फेअर फाऊंडेशनचे विशाल भोसले यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देताना न्युनगंड दुर ठेवून सातत्याने प्रयत्नशील राहिल्यास यश संपादन होत असल्याचे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अंकुश आहेर यांनी अशा प्रकारचा उपक्रम महाविद्यालयात सुरू केल्याबद्दल संस्था व महाविद्यालयीन स्पर्धा परीक्षा केंद्र समन्वयक प्रा. विलास बुवा सदस्य प्रा. तेजश्री हुंबे ,अभिजीत शिंगाडे ,विकास हास्पे ,रवी गायकवाड यांचे आभार व्यक्त करून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना कोणताही न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने सामोरे जायला हवे अशा प्रकारचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. यावेळी महाविद्यालयातील प्रा.राजेंद्रकुमार डांगे,डॉ सुहास भैरट, विजय केसकर, प्रा.जोत्सना गायकवाड, शिवाजी कदम आदी प्राध्यापक व प्राध्यापककेत्तर कर्मचारी व महाविद्यालयातील १२५ विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे निवेदन प्रा. डॉ. तेजश्री हुंबे व आभार प्राध्यापक अभिजित शिंगाडे सर यांनी व्यक्त केले.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *