Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
कांदा, बटाटा, कारली, मिरची, पावटा स्वस्त , मटारच्या दरात वाढ – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

कांदा, बटाटा, कारली, मिरची, पावटा स्वस्त , मटारच्या दरात वाढ

कांदा, बटाटा, कारली, मिरची, पावटा स्वस्त , मटारच्या दरात वाढ

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

पुणे : घाऊक बाजारात कांदा, बटाटा, हिरवी मिरची, कारली, ढोबळी मिरची, पावटा या फळभाज्यांच्या दरात घट झाली.
मटारच्या दरात वाढ झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात राज्य तसेच परराज्यातून मिळून ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.
घाऊक बाजारात आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून १५ ते १६ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून मिळून ४ ते ५ टेम्पो शेवगा,
मध्य प्रदेशातून ७ ते ८ टेम्पो गाजर,
मध्य प्रदेश आणि गुजरातमधून १० ते १२  ट्रक लसूण,
गुजरात आणि कर्नाटकातून मिळून ४ ते ५ टेम्पो कोबी,
आग्रा, इंदूर, गुजरात तसेच स्थानिक भागातून मिळून ७० ते ७५ ट्रक बटाटा अशी आवक परराज्यातून झाली,
अशी माहिती बाजारातील प्रमुख व्यापारी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून सातारी आले ११०० ते १२०० गोणी, टोमॅटो ६ ते ७  हजार पेटी,
ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो,
फ्लॉवर १० ते १२ टेम्पो,
गवार ४ ते ५ टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो,
तांबडा भोपळा ५ ते ६ टेम्पो,
पुरंदर,पारनेर,वाई भागातून ४०० ते ५०० गोणी मटार,
भुईमूग शेंग एक हजार गोणी, पावटा ४ ते ५ टेम्पो,
कांदा ६० ते ७० ट्रक अशी आवक झाली.
कोथिंबीर, मेथी, चाकवत महाग कोथिंबीर, मेथी, चाकवत, अंबाडी या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.
शेपू, कांदापात, करडई, पुदिना, राजगिरा, चवळईच्या दरात घट झाली आहे.
पालकाचे दर स्थिर आहेत.
मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीच्या दीड लाख लाख जुडी तसेच मेथीच्या ६० हजार जुडींची आवक झाली.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *