इंदापूर शहरातील रस्त्यांच्या कामास सुरुवात
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
इंदापूर शहरातील मुलानपट्टा, कुंभार गल्ली, सुतार गल्ली, जामदार गल्ली, तसेच संभाजी चौक ते संत रोहिदास नगर मधील सर्व गल्ली बोळ मधील रस्त्यांची कामे (काँक्रेटचा रस्ता अंदाजे किंमत 60 लाख रुपयांची) जे अनेक वर्षांपासून प्रलंबित होते ते ना. दत्तात्रय मामा भरणे राज्यमंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा यांच्या निधीतून व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या प्रयत्नातून तसेच आदरणीय विठ्ठल आप्पा ननवरे पाठपुरावातून कामास सुरुवात करण्यात आली त्या वेळी प्रामुख्याने विठ्ठल आप्पा ननवरे माजी नगराध्यक्ष, सुरेश नाना गवळी माजी नगराध्यक्ष, धनंजयशेठ बाब्रस माजी उपनगराध्यक्ष, दादासाहेब सोनवणे माजी नगरसेवक, अलीभाई मोमिन ज्येष्ठ कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर,अहेमदरजा सय्यद शहराध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग इंदापूर, ऋषिकेश मोहिते उपाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग इंदापूर,दत्तुजी शेवाळे ज्येष्ठ नागरिक केशवजी कुंभार बन्सी भंडलकर कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,वाजिद सय्यद, मयुर आरडे आणि या भागातील अनेक तरुण व ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते.
