Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
राज्यातील १५ जिल्हा बँकांच्या निवडणुका करोनाच्या तिसऱ्या लाटेवर अवलंबून – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

राज्यातील १५ जिल्हा बँकांच्या निवडणुका करोनाच्या तिसऱ्या लाटेवर अवलंबून

राज्यातील १५ जिल्हा बँकांच्या निवडणुका करोनाच्या तिसऱ्या लाटेवर अवलंबून

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

पुणे : राज्यातील १५ जिल्हा बँकांच्या निवडणुका घेण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरणाने मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे.
या बँकांच्या अंतिम मतदार याद्या २७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
मात्र, मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर किमान एक महिन्याच्या कालावधीनंतर म्हणजेच ऑक्टोबरअखेरीस प्रत्यक्ष निवडणुका होऊ शकणार आहेत.
दरम्यान, करोना संसर्गाची तिसरी लाट सप्टेंबर किं वा ऑक्टोबर महिन्यात येणार असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला असल्याने जिल्हा बँकांच्या निवडणुका करोनाची तिसरी लाट येण्यावरच अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे.
करोना रुग्णसंख्या घटत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात राज्यातील १५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
त्यामध्ये पुणे, लातूर, मुंबै, जळगाव, रत्नागिरी, धुळे-नंदूरबार, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सातारा, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर आणि बुलढाणा या जिल्हा बँकांचा समावेश आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील,
त्या टप्प्यावर ३१ ऑगस्टपर्यंत स्थगित केल्या आहेत.
मात्र, ९ ऑगस्टच्या आदेशानुसार जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती,
त्या टप्प्यापासूनच पुढे कार्यवाही सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यानुसार मतदार यादी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *