Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल चौकशीसाठी ई.डी. कार्यालयात – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल चौकशीसाठी ई.डी. कार्यालयात

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल चौकशीसाठी ई.डी. कार्यालयात

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

सक्तवसुली संचलनालय (ई.डी.) महाविकास आघाडीतील नेत्यांची पाठ सोडत नसल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे प्रकरण ताजे असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल मुंबईच्या ई.डी. कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत.
सीजे हाऊस प्रकरणात ही चौकशी होत असल्याची चर्चा होत आहे.
यापुर्वी ई.डी.ने २०१९ मध्ये प्रफुल्ल पटेल यांची तब्बल १२ तास कसून चौकशी केली होती.
याच प्रकरणात ई.डी. पुन्हा चौकशी करत असल्याचे बोलल्या जात आहे.
२०१९ मध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा सहकारी इक्बाल मिर्ची याच्या पत्नीसोबत करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी ई.डी.ने प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावले होते.
पटेल यांच्या कुटुंबाची मालकी असेलल्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून इक्बाल मेमन याला एक प्लॉट देण्यात आला होता.
हा प्लॉट वरळीमधील नेहरू तारांगणच्या समोर आहे.
याच ठिकाणी मिलेनियम डेव्हलपर्सने १५ मजली इमारत उभी केली आहे. तत्याचे नाव सीजे हाऊस असं ठेवण्यात आलं आहे.
दरम्यान ई.डी.ने सीजे हाऊस इमारतीचा तिसरा आणि चौथ मजला जप्त केला आहे.
ही इक्बाल मिर्चीची मालमत्ता असल्याचे सांगितले जाते.
याच प्रकरणात आर्थिक गैरव्यवहारप्रकर झाल्याची देखील केस आहे.
याबाबत चौकशीसाठी प्रफुल्ल पटेल यांना ई.डी.ने बोलावल्याची माहिती आहे.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *