Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/shiv-kalyannews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/endpoints/class-wp-rest-settings-controller.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/rest-api/fields/class-wp-rest-user-meta-fields.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-text.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-posts.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-recent-comments.php on line 1
जय प्रहार* – संपादक :- शहाजीराजे भोसले
Sat. Jun 6th, 2026

*जय प्रहार*

*तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि माढा तालुक्यातील दिव्यांग नयना जोकारला प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचा मदतीचा हात दिला*
माढा तालुक्यातील मानेगांव येथील रहिवासी असलेल्या दिव्यांग नयना जोकार शासनाच्या विविध योजना तिच्या पर्यंत पोहचत नसल्याची वेदना राज्यमंत्री बच्चू कडू यांना फोन करत तिच्या दैनंदिन जीवनात मुलभुत गरजांचा अन्न, वस्त्र, निवारा मिळत नसल्याचा पाढाच वाचला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ बघता बघता लाखो लोकांनी पाहीला .
तो व्हिडिओ पाहून सोलापूर जिल्ह्यातील प्रहारचे पदाधिकारी तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्व मदत घेऊन नयनाच्या घरी पोहोचले आणि तिच्याशी चर्चा करून नयनाच्या समस्या जाणून घेऊन घरासाठी लागणारे सर्व बांधकाम साहित्य तात्काळ खरेदी करून दिले आठ दिवसांत बांधकाम पूर्ण करण्यासाठी काँट्राक्टरला सुचना दिल्या.
मानेगांवचे सरपंच श्री लांडगे यांच्या माध्यमातून बांधकामासाठीच्या जागेचा प्रश्न तात्काळ सोडवून तिच्या साठी दिव्यांग घरकुल योजनेतून घरकुलाची घोषणा केली.
प्रहार औद्योगिक संघटनेचे आमोलशेठ जगदाळे यांनी मानेगांवच्या ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर गावात ६५ दिव्यांग नागरिक असल्याचे माहिती समोर आली. सरपंच श्री लांडगे यांना सर्व दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत स्तरावरून देण्यात येणार्‍या सर्व योजना मिळवून देण्यास सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख शंभुराज खलाटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बच्चूभाउ कडूंची संघटना अपंग, शेतकरी, शेतमजूर आणि रुग्णसेवेतून उदयास आली असून प्रहार कोणत्याही परिस्थितीत दिव्यांगांवरील अन्याय सहन करणार नसल्याचे सांगितले. प्रहार प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा संजिवनीताई बारंगुळे यांनी दिव्यांगांसाठीच्या शासकीय योजना आणि आणि दिव्यांगांचे अधिकार यावर मार्गदर्शन केले.
प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी त्याच ठिकाणी संकलीत केलेली भरगच्च रक्कम सरपंच लांडगे यांच्याकडे सुपूर्द करून पुढील कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना दिल्या. दत्तात्रय व्यवहारे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष, विठ्ठल आबा मस्के सोलापूर जिल्हा संघटक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मानेगांव ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच श्री लांडगे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
यावेळी विजय चव्हाण, दत्ता चौगुले, गणेश ननवरे, ज्ञानेश्वर गायकवाड, बसवराज शेगावकर सोलापूर, बापू राऊत, उमेशशेठ मखरे इंदापूर, सतिश बारंगुळे, नानासाहेब लोंढे इंदापूर तसेच मानेगांवचे मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थीत होते संजय जगताप सोलापूर जिल्हा अपंग क्रांती संघटना उपाध्यक्ष यांनी आपल्या खास शैलीत सूत्रसंचालन केले.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *