कळंब येथे पिण्याच्या पाण्याची गैरसोय
बंद अॅरो फिल्टर समोर जागरण गोंधळ घालून केला निषेध
इंदापूर तालुक्यातील कळंब येथील ग्रामपंचायत चालवित असलेल्या अॅरो फिल्टर प्लॅन्ट मधून ग्रामस्थ पिण्याचे पाणी नेतात.परंतु प्लॅन्टचा सतत घोटाळा होत असल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे, म्हणून आम्ही जागरण गोंधळ घालून निषेध करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल डोंबाळे, पोपट चव्हाण, संग्राम कोळी, धनंजय वरूडकर,संकेत/ बंटी मोहिते, श्रीकांत दळवी, बंडू दोभाडा,अमोल रेडेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच विद्या अतुल सावंत यांना अॅरो फिल्टर प्लॅन्टच्या नादुरुस्ती बाबत विचारले असता त्यांनी सांगितले कि, लवकरच प्लॅन्ट दुरूस्तीचे काम करून प्लॅन्ट पुर्वरत सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
