Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/class-wp-http-encoding.php on line 1
रेडा गावात "शिव जयंती"साजरी! - संपादक :- शहाजीराजे भोसले
Mon. Jun 8th, 2026

रेडा गावात “शिव जयंती”साजरी!

Spread the love

रेडा गावात “शिव जयंती”साजरी!

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

मौजे रेडा येथे भिमशक्ती सामाजिक संघटना रेडा शाखेच्या वतीने शिवजयंती उत्सव विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मूर्ती पूजन करण्यात आले .

दिनांक १८/०२/२०२२ रोजी कै.शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय या ठिकाणी निबंध स्पर्धा आयोजित केली होती .

त्यामध्ये मोठया गटात प्रथम क्रमांक मिळवलेल्या कु.हर्षद संदीपान गायकवाड,द्वितीय क्रमांक सिद्धी धनंजय कोकाटे,तृतीय क्रमांक दिक्षा विनोद भोसले आणि लहान गटात प्रथम क्रमांक साक्षी विठ्ठल माने, द्वितीय क्रमांक नेहा अमित देवकर, तृतीय क्रमांक मिळविला.किमया रमेश भोसले व मिरा अशोक मोहिते या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

रेडा गावच्या पोलीस पाटील सौ.ज्योती संतोष भोसले यांनी कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल त्यांना कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी भिमशक्ती सामाजिक संघटना तालुकाध्यक्ष युवराज (मामा) पोळ,सिंहा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भैय्यासाहेब पोळ, कृ.उ.बा.समितीचे संचालक सचिन देवकर,रेडा गावच्या सरपंच सौ.सुनिता नानासो देवकर,उपसरपंच सचिन देवकर, पोलीस पाटील सौ. ज्योती संतोष भोसले,ग्रामपंचायत सदस्य प्रभावती देवकर,कीर्ती सोनटक्के,धनंजय गायकवाड,सोमनाथ देवकर,युवा नेते योगेश देवकर,युवा नेते नानासो देवकर, विकास देवकर,ह.भ.प.उमराव महाराज देवकर,सिद्धेश्वर देवकर, पत्रकार संतोष भोसले,रोहिदास भोसले,भिमराव यादव,धिरज देवकर,प्रविण देवकर,विक्रम देवकर,अक्षय भिमराव देवकर,अक्षय संजय देवकर,विक्रांत गुळवे,भारत पवार,सोमनाथ महादेव देवकर,गणेश काका वाघ,बाबासो पवार,घनेशाम जवंजाळ,धनंजय देवकर,महादेव सपकळ,शिवाजी खंडाळे,राहुल बनसोडे,रोहित भोसले,रीतेश बनसोडे, ओंकार साखरे आदी मान्यवर उपस्थित होते.या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार कैलास पवार यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन भिमशक्ती सामाजिक संघटना रेडा शाखेचे अध्यक्ष राहुल बोबडे,उपाध्यक्ष सचिन बनसोडे,सचिव पांडू बाबा मोहिते यांनी केले होते.

Related Post

error: Content is protected !!