Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/class-wp-http-encoding.php on line 1
इंदापूर विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून एम. गौतमी यांची नियुक्ती! - संपादक :- शहाजीराजे भोसले
Mon. Jun 8th, 2026

इंदापूर विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून एम. गौतमी यांची नियुक्ती!

Spread the love

इंदापूर विधानसभा मतदारसंघाकरीता निवडणूक निरीक्षक म्हणून एम. गौतमी यांची नियुक्ती!

screenshot 20241103 084626 whatsapp

(सचिन तरंगे -शिवकल्याण न्यूज नेटवर्क )

भारत निवडणूक आयोगाकडून इंदापूर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून एम. गौतमी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती इंदापूर मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी दिली आहे.

श्रीमती एम. गौतमी यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-204 असा आहे. त्यांना दुपारी ३ ते सायंकाळी ५ यावेळेत नागरिकांना भेटता येईल. त्यांचा संपर्क क्रमांक ९०२१५०८३१७ असा असून दूरध्वनी क्रमांक ०२०-२९५२३३६६ असा आहे. तर ई-मेल पत्ता genobs.daund.indapur@gmail.com असा आहे. संपर्क अधिकारी श्री. नागनाथ कंजेरी हे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९५९५९९४४५५ असा आहे.

दरम्यान, श्रीमती एम. गौतमी यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयास भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला. श्री. पांढरे यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात स्थापित करण्यात आलेल्या विविध कक्षांची माहिती दिली. तसेच मतदान आणि मतमोजणीच्या अनुषंगाने केलेल्या पूर्व तयारीची देखील माहिती दिली. यावेळी विविध कक्षांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!