जिजामाता महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिर उत्साहात संपन्न !

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
निरा-नरसिंगपूर येथे दि. 17/01/ 25 ते 23 /01/25 या सात दिव
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक व जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.आप्पासाहेब जगदाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिजामाता महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिर उत्साहात संपन्न झाले. निरा-नरसिंगपूर येथे दि. 17/01/ 25 ते 23 /01/25 या सात दिवशीय कालखंडामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व जिजामाता महाविद्यालय सराटी यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर सामाजिक उपक्रमांनी पार पडले.
यावेळी शिबिरार्थींनी योगा,प्राणायाम,प्रार्थना, ग्रामस्वच्छता, आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर केले तसेच नृसिंह मंदिर , गाव परिसर, ग्रामपंचायत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली. तसेच व्याख्यानमालेमध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य कचरा व्यवस्थापन अंधश्रद्धा निर्मूलन, निर्भया जनजागृती,महिला सबलीकरण या विषयावर व्याख्याने झाली. तसेच मुलांसाठी हिप्नोटाईज संमोहन हिप्नॉटिझम मॅजिक कार्यक्रम घेण्यात आला. शिबिराच्या समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश लिपारे तसेच प्रा. मयुर पिसे , प्रा. प्रज्ञा गिरमे प्रा. अरुणा कोकाटे, गावचे (सरपंच) नितीन सरवदे, तसेच जगदीश सुतार उपसरपंच व अनु काका काकडे ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी व अन्य ग्राम सदस्य आदी मान्यवर उपस्थित विठ्ठल देशमुख माजी सरपंच यांनी राष्ट्रीय स्वयंसेवकांचे कौतुक केले त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारचे काम करून आमच्या गावची शोभा वाढवली असे त्यांनी मत मांडले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये ऋतिक गायकवाड ,समाधान लोखंडे ,रोहित कदम, पूजा पवार, सायली चंदनकर भाग्यश्री गायकवाड, काजल कोकाटे या विद्यार्थ्यांनी देखील कॅम्पमध्ये केलेल्या सर्व मजा मस्ती तसेच सर्व गावकऱ्यांमध्ये लागलेला जिव्हाळ्याचा नातेसंबंधांचा सहवास त्यांनी व्यक्त केला.
प्रा. मयूर पिसे यांनी शिबिर कामकाज आढावा सांगितला आणि प्रा.अरुणा कोकाटे यांनी आभार मानले व ऋतुजा शिंदे हिने सूत्रसंचालन केले.
