Thu. Apr 23rd, 2026

जागतिक सहकार परिषदेमुळे सहकार क्षेत्राच्या विकासाला चालना – हर्षवर्धन पाटील

Spread the love

जागतिक सहकार परिषदेमुळे सहकार क्षेत्राच्या विकासाला चालना – हर्षवर्धन पाटील

screenshot 20241128 170257 samsung internet

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

नवी दिल्ली येथे आयसीए जागतिक सहकार परिषद 2024 चे सोमवार दि.25 नोव्हेंबर पासून आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये बुधवारी दि. (27) हर्षवर्धन पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी या सहकार परिषदे संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी वरील मत व्यक्त केले. जागतिक सहकारी चळवळीची प्रमुख संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडीच्या आयसीए 130 वर्षाच्या इतिहासामध्ये ही परिषद प्रथमच भारतात होत आहे.

”सहकार सर्वांसाठी समृद्धी निर्माण करतात” ही या सहकार चळवळीची थीम आहे. संयुक्त राष्ट्रांनी सन 2025 वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे. अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. या सहकार परिषदेचे सोमवारी दि.(25) पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सहकार परिषदेत चर्चा पॅनल सत्रे आणि कार्यशाळा संपन्न झाल्या. तर समारंभ समारंभ 27 नोव्हेंबर रोजी सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या परिषदेच्या जगातील 100 हून अधिक देशांमधील सुमारे 3000 प्रतिनिधींनी सहभाग घेतला, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

Related Post

error: Content is protected !!