Fri. Apr 17th, 2026

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला – तानाजीराव थोरात (अध्यक्ष पुणे जिल्हा किसान मोर्चा भाजपा)

Spread the love

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला – तानाजीराव थोरात (अध्यक्ष पुणे जिल्हा किसान मोर्चा भाजपा)

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

इंदापूर तालुक्यातील राजकीय घडामोडी विषयी तानाजी थोरात यांनी आपली परखड भूमिका मांडली, हर्षवर्धन पाटील यांनी नेहमीच सोयीचे राजकारण केले आहे भाजपाचा अत्यंत सोयीस्कर असा वापर करून घेतला गेला भाजपाकडून स्वार्थ साधल्यानंतर त्यांनी आपली भूमिका अतिशय पद्धतशीरपणे बदलली, आज भाजपा सोडून इतर पक्षाचा घरोबा करण्याचे ठरवले आहे व कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचा बनाव करून इंदापूर तालुक्यातील जनतेला मूर्ख समजून आपली राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी रंग बदलणाऱ्या प्राण्याप्रमाणे भूमिका बदलत आहेत 1995 साली महाराष्ट्रामध्ये भाजपने यांना राज्यमंत्री केले ते पद्धतशीरपणे विसरले, भाजपाने हर्षवर्धन पाटलांचे अतिशय लाड केले पण यांचा बालहट्ट कधीच संपला नाही मारुतीच्या शेपटाप्रमाणे यांच्या मागण्या वाढत गेल्या 2019 मध्ये काँग्रेस मधून भाजपात आलेल्या हर्षवर्धन पाटील यांना भाजप कार्यकर्त्यावर विधानसभेची उमेदवारी देऊन लादले गेले तरीही आम्ही सर्व जुने हेवे दावे विसरून पक्ष आदेश म्हणून सर्वांनी त्यांचे अगदी मनापासून काम केले , त्या ठिकाणी पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले, हीच उमेदवारी भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळाली असती तर चित्र वेगळे राहू शकले असते.

इथून पुढे त्यांच्या मागण्या सातत्याने वाढत गेल्या, भाजपाने हर्षवर्धन पाटील यांना पक्षामध्ये स्वातंत्र दिले, परंतु जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय करून हर्षवर्धन पाटील हे स्वतःच्या मालकीचा पक्ष असल्याप्रमाणे वागू लागले तरीही भाजप कार्यकर्ता पक्ष प्रेमापोटी गप्पच होता भाजपामध्ये कधीही युवा मोर्चा कोअर कमिटी अध्यक्ष पद नसताना स्वतःच्या मुलाला पुत्र प्रेमापोटी या कमिटीचा स्वयंघोषित अध्यक्ष जाहीर केले गेले स्वतःचा मुलगा व मुलगी याशिवाय हर्षवर्धन पाटील यांना काहीच दिसत नव्हते. यांच्या होयबा कार्यकर्त्यांची टोळी बनवून मी सांगेल त्याचप्रमाणे सर्वांनी वागले पाहिजे असा शिरस्ता राबवला गेला मी म्हणजेच भाजप आणि भाजपा म्हणजेच मी या थाटामध्ये हर्षवर्धन पाटील वागले अन्य कार्यकर्त्यावर अन्याय करून भाजपा महाराष्ट्र प्रदेश मध्ये स्वतः निमंत्रित सदस्य म्हणून वर्णी लावून घेतली, स्वतःच्या मुलीला पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड करून घेतली हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहिले पण ते साध्य न झाल्याने व अनेक वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सरकारमधील राज्यमंत्री ,कॅबिनेट मंत्री या पदांवरती राहूनही हर्षवर्धन पाटील यांचा मोह कमी झाला नाही, एखाद्या कार्यकर्त्याला पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य करणे ऐवजी स्वतः भाजपांच्या नेत्यांच्या मागे लागून स्वतःची वर्णी लावून घेतली गेली. यावरही हर्षवर्धन पाटलांचे समाधान झाले नाही म्हणून माननीय श्री अमितजी शहा यांच्या मागे लागून मी महाराष्ट्रामधील सहकार मधला खूप मोठा अभ्यासक आहे असे सांगून व तशा पद्धतीचा अभास निर्माण करून भाजपामध्ये माझ्यासारखा कोणीच लायकीचा नाही म्हणून एन सी डी सी च्या सदस्य पदी नेमणूक करून घेतली. एवढ्या मागण्या मान्य झाल्यावर हर्षवर्धन पाटलांचे समाधान होईल असे वाटत होते. पण मारुतीच्या शेपटाप्रमाणे यांच्या मागण्या वाढतच गेल्या कोणत्याच भाजपा कार्यकर्त्यांकडे लक्ष न देता हर्षवर्धन पाटील भाजपा मध्ये फक्त पद मिळवण्यासाठीच मिरवत होते की काय हा सवाल उपस्थित होतो ???? भाजपामध्ये पक्षसंघटनेसाठी काहीच योगदान नसताना सर्व पदे मलाच मिळावीत हा बालहट्ट हर्षवर्धन पाटील करतच राहिले व पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मागे लागून राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष पद पदरात पाडून घेतले, एवढे करून हर्षवर्धन पाटील भाजपाचे समाधान दिसत नव्हते निराभिमा साखर कारखाना व कर्मयोगी साखर कारखाना यावर प्रचंड सभासदांचा रोष होता त्यांची बिले वेळेवरती सभासद शेतकऱ्यांना मिळत नव्हती, कामगारांचे पगार वेळेवर होत नव्हते म्हणून या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी सरकारकडून दोन्ही कारखान्यांना 225 कोटी रुपये मिळवून घेतले, तेव्हा थोड्याफार प्रमाणात कारखान्याची स्थिती सुधारली गेली अन्यथा हर्षवर्धन पाटील यांच्या दारात शेतकरी सभासद कामगार यांची आंदोलने बंद झाली नसती. एवढे सगळे करूनही हर्षवर्धन पाटील भाजपा मध्ये समाधानी नव्हते अमुल दूध संघ असाच मिळवला गेला यामधून पैसे कसे मिळतात हा भाग वेगळा आहे, हर्षवर्धन पाटलांच्या जाचाला कंटाळून अनेक भाजप कार्यकर्ते घरी बसले, काहींनी पक्ष सोडला पण हर्षवर्धन पाटील यांनी स्वभावात बदल केला गेला नाही सातत्याने अनेक वायक्तीक कामे महाराष्ट्र सरकार व केंद्रातील सरकार यांच्याकडून भाजपच्या माध्यमातून करून घेतली गेली तरीसुद्धा भाजपवर सातत्याने नाराजीचा सूर आवळत होते राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर माझी वर्णी लावावी म्हणून हर्षवर्धन पाटील प्रयत्न करत होते , एवढी सर्व पदे भाजपाच्या माध्यमातून मिळून सुद्धा हर्षवर्धन पाटलांसमोर कार्यकर्ते भाजपाला मत देताना हात थरथर कापतो म्हणतात आणि हर्षवर्धन पाटील गप्प बसतात हीच आपली पक्षनिष्ठा होती का ??? याचा अर्थ एवढे सगळे करून भाजपात आल्यावर शांत झोप लागून सुद्धा सरते शेवटी भाजपाकडून माझ्यावर अन्याय झाल्याची ओरड करत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊन टाकला हर्षवर्धन पाटलांसारखे नेत्यावर अन्याय झाल्याची ओरड थांबत नाही, एवढा अन्याय एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर झाला असता तर त्यांनी तो मरेपर्यंत भाजप सोडला नसता, कारण भाजपाचे शिकवण आहे की प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी मी याप्रमाणे भाजपचा कार्यकर्ता वागतो हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा सोडल्यामुळे भाजपा वर फार मोठा फरक पडेल असे अजिबात नाही पक्षामध्ये असे अनेक आले व अनेक गेले पक्ष हा संघटनेच्या जोरावर चालतो कोणा एका नेत्याच्या नाही , त्यामुळे भाजपा सातत्याने वाढत गेला आहे.
पण एवढी सर्व पदे देऊन एका पक्षात करमत नसल्यामुळे भाजपा पक्ष सोडून हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपा पक्षाला दगा दिला गेला आहे इंदापूर तालुक्यातील सुज्ञ जनता याचा नक्कीच विचार करेल आम्ही पुन्हा नव्या जोमाने भाजपाची मूठ इंदापूर तालुक्यामध्ये बांधून पक्ष पुन्हा पक्षाला गतवैभव प्राप्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत ,
ज्याप्रमाणे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा संघटनेतील पदाचे राजीनामा दिले त्याप्रमाणे साखर संघाच्या अध्यक्षपदाचा व एनसीडीसीच्या संचालक पदाचाही त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी थोरात यांनी, या पदांचे राजीनामा देऊन आपण इतर कोणत्याही पक्षात जाण्यास मोकळे आहात असे मत थोरात यांनी व्यक्त केले तानाजीराव थोरात यांच्या या वक्तव्यामुळे इंदापूर तालुक्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली असून संपूर्ण तालुक्यामध्ये व पुणे जिल्ह्यामध्ये याची चर्चा आहे. तानाजीराव थोरात हे भाजपाचे निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते असल्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Related Post

error: Content is protected !!