मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा रेडणीत शुभारंभ !

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
राज्यातील अत्यंत महत्वपूर्ण अशी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ रेडणी (ता. इंदापूर )येथे पुणे जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील यांच्या शुभहस्ते झाला.
मौजे रेडणी (ता इंदापूर )येथील ग्रामपंचायत कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला होता.
या कार्यक्रमांस ग्रामपंचायतच्या सरपंच हिराबाई खाडे, उपसरपंच सुभाष शिर्के, माजी उपसरपंच प्रफुल्लकुमार चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य कोमल लोंढे, सविता सोनटक्के, सुवर्णा काळकुटे, स्वाधीन खाडे,मा.ग्रामपंचायत सदस्य अनंतराव काळकुटे, मा.उपसरपंच प्रकाश शेडगे,तसेच माऊली हाके, दिपक तरंगे, हनुमंत धांडोरे,दिपक काळे, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
