बारामतीच्या कृषीदुतांकडून “संत सोपानकाका महाराज” पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी मदतीचा हात !

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
दि. 15/07/2024 रोजी, लालपुरी (कळंब), ता. इंदापुर जि. पुणे येथे डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामतीचे कृषीदूत, “रावे” या उपक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रम पार पाडत आहेत. त्याचेच औचित्य साधून कृषीदूतांनी “संत सोपानकाका महाराज “पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला.
दरवर्षीप्रमाणे “ संत सोपानकाका महाराज”पालखी सोहळ्याचे ,मौजे “लालपुरी (कळंब)” या गावात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. गावकऱ्यांनी पालखीच्या आगमनाची तयारीसुद्धा जोमाने केली होती. याचेच औचित्य साधून गावात ओलेल्या “बारामती अॅग्रीकल्चर महाविद्यालच्या कृषीदुतांकडून वारकऱ्यांसाठी फळांचा आहार देण्यात आला.
उन्हातान्हातून पायी वारी करत जाणाऱ्या भक्तांची शारीरीक क्षमता वाढविण्यासाठी व त्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी फळांचा आहार देण्यात आला. तसेच वारकऱ्यांचे शारिरीक मनोबल वाढावे यासाठी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागतही केले.तसेच वारकऱ्यांकडून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीबद्दल शुभेच्छा आणि आशिर्वाद देण्यात आले.
तसेच हा उपक्रम पारपाडण्यासाठी लालपुरी , कळंब , रणगाव या तिन्ही गावांतील ग्रामस्थांनीसुद्धा मोलाचे सहकार्य केले.
या उपक्रमाचे नियोजन लालपुरी येथील कृषिदूत — ओम पवार, लक्ष्मीकांत माळवे, श्रीनिवास पाटील, सुमेध चौरे, अवधूत कांबळे, सुरज जगताप, सुमित चव्हाण, विशाला पवार तसेच कळंब येथील — प्रथम राठी, कृष्णा रेड्डी, धनराज सवळगी, केदार पाटिल, रेवन थोरात, विराज पवार , प्रितम कादे ,अजिंक्य जाधव आणि रणगाव येथील — अभिनंदन कोडग, अभी जगताप, प्रथमेश माने, श्रीहरी कदम, मयुर कोळी, अभय काटे ,सौरभ साठे, ऋषिकेश गायकवाड या कृषिदूतांकडून करण्यात आले होते. तसेच या उपक्रमाबद्दल ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे अधिकारी प्रा. एस.पी गायकवाड ,एस. व्ही. बरुंगले यांनी मार्गदर्शन केले.
